Ankita Lokhande- Vicky Jain's lip lock  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात अंकिताचं सुटलं भान! लिपलॉक व्हिडिओ व्हायरल

Ankita Lokhande- Vicky Jain's lip lock : अंकिताचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Vaishali Patil

Ankita Lokhande- Vicky Jain's lip lock: सध्या बिग बॉसचा सिझन 17 चांगलाच चर्चेत आहे. या शोला आता एक आठवडा पुर्ण झाला आहे. तर या आठवड्याचा पहिला विकेंड का वार नुकताच झाला. यावेळी विकेंड का वार मध्ये सलमान खानने खानजादीचा क्लास घेतला. या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी तीन स्पर्धक नॉमिनेट झाले होते ज्यात मन्नारा , नवीन आणि अभिषेक कुमारचं नाव होतं.

मात्र यावेळी नवरात्री निमित्त घरातील सर्व स्पर्धकांसाठी आनंदाची बातमी भाईजाननं दिली. घरातून कुणालाही बाहेर काढण्यात आलेले नाही. तर यावेळी बिग बॉसच्या घरात कंगना राणौत आली होती. तिने सलमान खानसोबत खुप मस्ती केली आणि घरातील स्पर्धकांसोबत गेमही खेळला.

मात्र या सगळ्यात घरातील तगडी स्पर्धक अंकिता लोखंडे चर्चेत आली . खर तर अंकिताचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगानं व्हायरल होत आहे. यात तिने चक्क बिग बॉसच्या घरात लिपलॉक केलं आहे.

अंकिता लोखंडे-विकी जैन आणि ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट या जोडप्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी कंगनाने एक टाक्स दिले होते. या टाक्समध्ये दोन्ही जोडप्यांना डान्स करायचा होता. अंकिता आणि विकी यावेळी त्याच्या डान्समध्ये इतके हरवले की अंकिताचे भान सुटले आणि तिने विकीला किस केले.

नॅशनल टेलिव्हिजनवर या जोडप्याचे लिप-लॉक केल्याने सध्या सोशल मिडियावर दोघांची चर्चा सुरु झाली आहे. अंकिता आणि विकीच्या किसिंग सीनने सगळेच हैराण झाले होते. कंगनानेही त्यांची खिल्ली उडवली आणि म्हणाली की अंकिता, यापेक्षा जास्त काही करू नकोस. त्यानंतर अंकितालाही असं वागणे शरमेचं वाटले.

आता सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकरी अंकिता आणि विकीला ट्रोल करत आहे. एकीकडे अंकिता तिचा पती विकी जैन नेहमी एकमेंकासोबत वाद घालताना दिसतात तर दुसरीकडे अंकिताने केलेली ही कृती, त्यामुळे ती फक्ता ड्रामा करत असल्याचे नेटकरी बोलत आहे.

यापुर्वी बिग बॉसच्या ओटीटी सिझनमध्ये जैद आणि आकांक्षा पुरी यांनी देखील लिप लॉक केले होते ज्यानंतर सगळ्यांनी शोवर टीका केली होती तर सलमान खानने देखील दोघांचा क्लास घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT