Bigg Boss 4 Marathi Grand Finale Live Updates Mahesh Manjrekar hosted viral  sakal
मनोरंजन

Bigg Boss 4 Marathi : 'अक्षय'नं कोरलं बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये बिग बॉसची उत्सुकता कायमच प्रेक्षकांच्या मनात असते. आज त्या रियॅलिटी शो चा ग्रँड फिनाले पार पडतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 4 Marathi : 'अक्षय'नं कोरलं बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव

गेल्या तीन महिन्यापासून घराघरात गाजत असलेल्या कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी शोची आज अखेर सांगता झाली. अखेर 100 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता म्हणूव अक्षय केळकरने ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं आहे

 किरण माने बिग बॉसच्या घराबाहेर

Bigg Boss Marathi 4 Finale : सर्वांचा लाडका किरण माने आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. यावेळी त्याला अश्रु अनावर झाले होते. कुणालाही किरण हा शेवटच्या तीन स्पर्धकांतून बाहेर पडेल असे वाटले नव्हते. तीनही स्पर्धकांनी एकमेकांची भेट घेत निरोप दिला. आम्ही शंभर दिवस एकत्र राहिलो याचा खूप आनंद आहे. असे सांगितले.

किरणने कुणाशी भांडणं झाली नाहीत असं नाही त्याचे अपूर्वाशीही भांडण झाले. पण त्याने सगळ्या सदस्यांशी जवळचे संबंध जोपासले होते. किरणच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अमृता धोंगडे घराबाहेर पडणारी दुसरी स्पर्धक

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारी दुसरी स्पर्धक म्हणून अमृतानं एक्झिट घेतली. यावेळी तिला अश्रु अनावर झाले होते. यावेळी अपूर्वा देखील भावूक झाली होती. बाकीच्या स्पर्धकांनी तिला मोठ्या प्रेमाने निरोप दिला.

Bigg Boss 4 Marathi Finale Live : अमृतानं घेतली किरण, अपूर्वा, अन् अक्षयची शाळा!

अमृता देशमुख ही बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यात जास्त बोलणारी स्पर्धक होती. अशा शब्दांत महेश मांजरेकर यांनी तिची ओळख करुन दिली. तिचं वाकचातुर्य हे नेहमीच चाहत्यांसाठी चर्चेचा विषय होता. असे सांगून तिला स्पर्धकांविषयी बोलण्यासा सांगितले.

यावेळी अमृता तिच्या नेहमीच्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. अपूर्वाच्या त्या शाब्दिक फटकेबाजीला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

Bigg Boss 4 Marathi Finale Live : राखी ९ लाख घेऊन घराबाहेर...

राखी सावंतनं मोठी हिंमत घेऊन ९ लाख रुपये घेतले. आणि तिनं बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. हे मी माझ्या आईसाठी हे करते आहे असे राखीनं सांगितलं. राखीनं आपल्याला काही गोष्टींसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. हे सांगताना तिला अश्रु अनावर झाले होते.

टीप टीप बरसा पानी...राखीचा डान्स, चाहते खल्लास!

नदीया पार सजन का ठाणा....गाण्यावर राखी थिरकली आणि चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला. राखीनं बिग बॉसच्या मराठी रियॅलिटी शो मध्ये जीव आणला असे अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. राखीनं देखील आपण गेल्या तीस दिवसांत तीनशे दिवसांचे मनोरंजन केल्याचे म्हटले आहे. यंदाच्या सीझनमध्ये आपणच विजेते होऊ असा दावाही तिनं केला आहे.

Bigg Boss 4 Marathi Finale Live : राखी, अपूर्वा, अमृताचा राडा! किरण मानेही जोरात...

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या अंतिम सोहळ्याला आता सुरुवात झाली आहे. सगळ्या स्पर्धकांची रॉकस्टार इंट्री झाली आहे. त्यासगळयात राखी, अपूर्वा आणि अमृताच्या इंट्रीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकरत त्यांनी चाहत्यांची पसंती मिळवली आहे.

दुसरीकडे किरण मानेही दमदार परफॉर्मन्स देताना दिसतो आहे. त्यानं करंट लगा रे गाण्यावर केलेलं सादरीकरण नेटकऱ्यांना आवडलं आहे. त्याची चर्चा होताना दिसते आहे. किरण मानेकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

अपूर्वा म्हणते ९ लाख रुपये माझ्यासाठी मोठी रक्कम! पण....

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. यापूर्वीच्या त्याच्या व्हायरल झालेल्या टीझरमधून कोणत्या स्पर्धकाला बिग बॉसनं वेगवेगळी आमिषं दाखवली याविषयी सांगितले जात आहे. त्यामध्ये अपूर्वानं आपल्यासाठी नऊ लाख रुपये मोठी रक्कम असल्याचे सांगून मोठा धक्का चाहत्यांना दिला आहे.

Bigg Boss Marathi 4 Finale : 'आली रे आली आता शेवटची वेळ....' कोणाचा होणार खेळ?

Bigg Boss Marathi 4 Finale : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये बिग बॉसची उत्सुकता कायमच प्रेक्षकांच्या मनात असते. आज त्या रियॅलिटी शो चा ग्रँड फिनाले पार पडतो आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी या शो च्या सुत्रसंचालनाची जबाबदारी घेतली. ती यशस्वीरीत्या पारही पाडली आहे.

अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने हे नाव विजेत्यांच्या यादीत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अपूर्वा नावाची लाट आहे तर ग्रामीण भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात, साताऱ्यात किरण मानेचे नाव विजेत्यांच्या यादीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT