Manisha Rani-Tony Kakkar Dating Rumours  Esakal
मनोरंजन

Manisha Rani: बिग बॉसमधुन बाहेर येताच मनिषा करतेय टोनी कक्करला डेट? खुलासा करत म्हणाली,..

Vaishali Patil

Manisha Rani-Tony Kakkar Dating Rumours: बिग बॉस OTT 2 च्या घरात प्रेक्षकांचे भरपुर मनोरंजन करणारी अभिनेत्री मनीषा रानी ही गेल्या काही दिवासांपासून चर्चेत आहे. बिग बॉस OTT 2 नंतर तिच्या लोकप्रियतेत कमालिची वाढ झाली. या शोने तिला एंटरटेनमेंट क्वीनचा टॅगही दिला. तिने प्रेक्षकांची मने जिंकत ती या शोची सेकंड रनर अप ठरली.

सध्या मनीषाचे नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले जात आहे. तिच्या आणि सिंगर टोनी कक्करच्या डेटिंगच्या बातम्याही खुप रंगल्या होत्या. मात्र आता एका मुलाखतीत तिने या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

बिग बॉस OTT 2 संपल्यानंतर ती अनेकदा टोनीसोबत स्पॉट झाली. त्यामळे दोघांच्या डेटिंगच्या अफवांना चांगलीच हवा मिळाली. इचकच नाही तर मनिषाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर टोनिषा हे हॅशटॅगही व्हायरल केला.

मनिषा ही तिच्या मैत्रीमुळे नेहमी चर्चेत असते. तिची बिग बॉसच्या घरातही एल्विश आणि अभिषेक यांच्यासोबतही चांगली गट्टी जमली होती.

सोशल मिडियावर एल्विशा , अभिशा, टोनिशा असे बरेच हॅशटॅगही व्हायरल होत आहे. त्यावर जेव्हा मनिशाचा आवडता हॅशटॅग कोणता हे विचारल्यावर तिने याबद्दल सांगितले.

या प्रश्नावर उत्तर देतांना मनिषा म्हणाली की, तिला तिन्ही हॅशटॅग आवडतात. सध्या 'तोनिषा' आणि 'अभिषा' हे दोन्ही तिच्या मनाजवळ आहे. बिग बॉसच्या घरात अभिषेक तिझा खूप चांगला मित्र होता. त्याच्यासोबत तिची मैत्री कायम राहील असंही ती म्हणाली. तर 'तोनिषा'बद्दल बोलतांना ती म्हणाली की, टोनी कक्करशी तिची मैत्री नुकतीच सुरू झाली आहे. ते अत्ता जरा चांगले मित्र झाले आहेत.

तर टोनी बद्दल बोलतांना मनिषा म्हणाली की, 'टोनी कक्कर हा खूप चांगला आहे. खुप कमी वेळात माझी त्याच्यासोबत मैत्रीही झाली. तो एक शांत आणि सभ्य स्वभावाचा माणूस आहे.

टोनी लोकांचा आदर करतो. सहसा स्टार लोकांमध्ये खुप इगो असतो मात्र जेव्हा तो माझ्या वडिलांना भेटला त्याने वडिलांचे पाय पडले मला त्याची हे वागणं खुप आवडलं. नेहा कक्कर देखील खूप चांगली आहे आणि दोघेही 'डाउन टू अर्थ' आहेत.

तर डेटिंगबद्दल विचारल्यानंतर मनीषा राणीने या सर्व अफवा असल्याच सांगत सर्व बातम्यांना फुलस्टॉप लावला. ते दोघेही फक्त मित्र असल्याचं तिने सांगितलं.

मनिषा आणि टोनी कक्कर हे दोघेही लवकरच एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

SCROLL FOR NEXT