Rochelle Rao Baby Rochelle Rao Blessed with Baby Girl: Esakal
मनोरंजन

Rochelle Rao Baby: "जे मागितलं ते परमेश्वराने दिलं.." 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या घरी आली लक्ष्मी!

Vaishali Patil

Rochelle Rao Blessed with Baby Girl: टीव्ही मालिका अभिनेत्री आणि मॉडेल रोशेल राव आणि तिचा पती कीथ सिक्वेरा यांनी चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. हे कपल आता एका सुंदर परीचे पालक बनले आहेत. रोशेलने एका मुलीला जन्म दिला आहे. लग्नाच्या पाच वर्षांनी रोशेल आणि किथ यांच्या घरी परी आली आहे. रोशेलने 1 ऑक्टोबरला मुलीला जन्म दिला आहे.

रोशेलने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेयर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. यासोबततच तिने मुलीचा फोटोही शेयर केला आहे.

एक व्हिडिओ शेअर करताना त्यांनी आम्हाला मुलगी झाल्याचे सांगितले. दोघांनी सांगितले की त्यांच्या मुलीचा जन्म 1 ऑक्टोबर 2023 रोजी झाला. या व्हिडिओच्या नोटमध्ये, रोशेलने लिहिले, 'सर्वात मोठ्या आशीर्वादासाठी देवाचे आभार, आमची लहान मुलगी, बेबी सिक्वेरा, ऑक्टोबर 2023 च्या पहिल्या दिवशी तिचा जन्म झाला. या अप्रतिम प्रवासात तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी या बाळासाठी प्रार्थना केली आणि मी जे मागितले ते परमेश्वराने मला दिले.

कीथ सिक्वेराला नेहमीच मुलगी हवी होती. या जोडप्याला पहिलं बाळ मुलगी व्हावी अशी इच्छा होती. त्यामुळे देवाने त्यांचे म्हणणे ऐकले आणि लक्ष्मीला त्यांच्या घरी पाठवलं असं ते म्हणतात.

रोशल राव आणि कीथ सिक्वेरा यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. दोघांनी 4 मार्च 2018 रोजी तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार समुद्र किनाऱ्यावर लग्न केले. आता या लग्नाच्या 5 वर्षांनंतर या जोडप्याला ही आनंदाची मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT