bigg boss fame shiv thakare mom reaction on sons new car video viral
bigg boss fame shiv thakare mom reaction on sons new car video viral sakal
मनोरंजन

Shiv Thakare Video: तिची माया वेगळीच! शिवची नवी गाडी पाहून भारावली आई.. व्हिडिओ व्हायरल..

नीलेश अडसूळ

Shiv Thakare Video: बिग बॉस फेम शिव ठाकरे ने काहीच दिवसापूर्वी एक नवीन आलीशान गाडी खरेदी केली होती. या गाडीची सर्वत्र चर्चा झाली. या गाडीचे फोटोही व्हायरल झाले होते. पण ही गाडी घेऊन शिव नुकताच त्याच्या गावी गेला. यावेळी गाडी पाहून त्याची आई भारावून गेली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर शिवने नवी कोरी कार खरेदी केली. जवळपास ३० लाख किंमतीची ‘टाटा हॅरिअर’ ही गाडी त्याने खरेदी केली आहे. याच गाडीचा आता शिवच्या आई सोबतचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

(bigg boss fame shiv thakare mom reaction on sons new car video viral)

शिव आपली नवीन गाडी घेऊन गावी गेला होता. यावेळी शिवची नवी गाडी पाहिल्यानंतर त्याच्या आईचा आनंद गगनाच मावेनासा झाला. शिवची आई गाडीची पूजा करते. गाडीतील गणपतीच्या मूर्तीची ही पूजा करते. त्यानंतर शिव त्याच्या नव्या कोऱ्या गाडीमधून कुटुंबियांना फिरायला घेऊन जातो. यावेळी सगळेच आनंदात दिसतात. हा व्हिडिओ सध्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

शिव ठाकरे हे नाव गेल्या काही वर्षात मनोरंजन विश्वात विशेष करून टेलिव्हिजन वर हे नाव सातत्याने घेतलं जात आहे. त्यामुळे शिव ठाकरे आता घराघरातच नाही तर मनमनात पोहोचला आहे. एम टिव्ही 'रोडीज' मधून आलेला हा अमरावतीचा शिव ठाकरे बघता बघता तरूणांना भुरळ घालून गेला. मग त्याने बिग बॉस मराठी गाजवलं आणि जिंकलंही.

नुकत्याच झालेल्या बिग बॉस हिंदीच्या 16 व्या पर्वात सहभाग घेतला होता त्यामुळे त्याचे चाहते देशभरात पसरले. टॉप 2 स्पर्धकांमध्ये शिवचा समावेश झाला. या पर्वातून शिव ची एक वेगळी ओळख समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT