Santosh Juvekar: गुदमरून मारण्यासाठी केलेली सोय.. 'तो' व्हिडिओ आणि संतोष जुवेकरची सणसणीत पोस्ट..

संतोष जुवेकरने एक पोस्ट शेयर करत खंत व्यक्त केली आहे.
Santosh Juvekar shared pollution and angry reaction on it
Santosh Juvekar shared pollution and angry reaction on itsakal

santosh juvekar : झेंडा, मोरया, एक तारा आणि यासारखे कितीतरी चित्रपट गाजवलेला उत्तम अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. केवळ चित्रपटच नाही तर मालिकांमधूनही तो घराघरात पोहोचला. लवकरच तो 'रावरंभा' चित्रपटात झळकणार आहे.

संतोष सोशल मिडियावरही बराच सक्रिय असतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. संतोष अभिनया सोबत सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. तो सतत काहीना काही पोस्ट करत असतो. कधी आपले विचार व्यक्त करतो तर कधी समाजातील चुकीच्या गोष्टींवर ताशेरे ओढतो.

आज त्याने एक पोस्ट शेयर केली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याने एक भीषण वास्तव आपल्या समोर मांडले असून खंत व्यक्त केली आहे.

(Santosh Juvekar shared pollution and angry reaction on it)

Santosh Juvekar shared pollution and angry reaction on it
Natya Parishad Election: नाट्य परिषदेचा गुलाल कुणाच्या कपाळी.. प्रसाद कांबळी की प्रशांत दामले?

संतोषनं नुकतंच एक भयानक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. घराच्या खिडकीतून हा व्हिडीओ त्याने शूट केल्याचं दिसत आहे. संतोषने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये धुराचे लोट हवेत पसरताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करत त्याने एक संतप्त पोस्ट लिहिली आहे. ''हे काय आहे ओ? बहुतेक गुदमरून मारण्यासाठी केलेले कॉन्ट्रॅक्ट किंवा स्वतः गुदमरून मरण्यासाठी केलेली सोय?” असं त्याने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे.

प्रदूषण पाहून चिडलेल्या संतोषने ही पोस्ट शेयर करत आपली खंत व्यक्त केली आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही आपले विचार मांडले आहेत. 'आकाशी उच उडणारे पक्षी पण त्या धुरातून गुदमरून ओरडत इकडून तिकडून उडताना दिसत आहेत… किती भयानक आहे हे सर्व' अशी कमेंट एकाने केली आहे.

तर 'रबाळेमध्ये काल केमिकल कंपनीला आग लागली होती… त्याचा धूर असेल,' असं एकाने म्हटलं आहे. 'मी पण आताच ट्रेनमधून हे पाहिलं. महापेजवळ कुठेतरी आहे,' अशी कमेंटही एकाने केली आहे. संतोषची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com