aavishkar neetha 
मनोरंजन

BBM 3: आविष्कार बिग बॉसच्या घराबाहेर; नीथा शेट्टीची एण्ट्री

आविष्कार बाहेर गेल्यानंतर घरामध्ये दुसरी वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली.

स्वाती वेमूल

बिग बॉस मराठी सिझन ३ मध्ये शनिवारच्या चावडीत काय होणार याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांना असते. गेल्या आठवड्यात कोणकोणत्या सदस्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब लागणार, हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचं होतं. महेश मांजरेकर या चावडीवर सदस्यांना ते कुठे चुकले हे सांगतात, याचसोबत कोणता सदस्य चांगला खेळला हे देखील सांगतात. काहींची कानउघडणी करतात, तर काहींच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात, त्यांना सल्ले देतात. या आठवड्यात बिग बॉसच्या चावडीवर विशाल निकमची महेश मांजरेकरांनी शाळा घेतली. तर मीनलला सल्ला दिला. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या चाहत्यांची चुगली ही चुगली बूथद्वारे सोनाली, मीरा, गायत्री आणि जयला दाखविण्यात आली. तर दादूस आणि तृप्तीताईंनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली. बिग बॉसच्या घरामध्ये आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. आविष्कार, स्नेहा, सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये आहेत असं महेश मांजरेकरांनी सांगितलं. आता या चार जणांमधून कोणाला घराबाहेर जावं लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. आविष्कार दारव्हेकरला या आठवड्यात बिग बॉसच्या घरामधून बाहेर जावं लागलं.

आविष्कार बाहेर गेल्यानंतर घरामध्ये दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री झाली. अभिनेत्री नीथा शेट्टी – साळवी हिने घरात एंट्री केली. नीथाच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलणार, कोणत्या ग्रूपमध्ये जाणार, की ती स्वतंत्र तिचा खेळ खेळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

नव्या सदस्यासोबतचा नवा आठवडा कसा असेल, कोणते सदस्य नॉमिनेट होणार, कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार हे प्रेक्षकांना सोमवार ते रविवार रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT