Meenal Shah, Mira Jagganath instagram
मनोरंजन

BBM 3: टक्कल करण्यास तयार होणाऱ्या मीनलने जिंकलं नेटकऱ्यांचं मन

'जिंकलंस!' असं म्हणत नेटकऱ्यांनी केलं मीनलचं कौतुक.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi 3: छोट्या पडद्यावरील कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ३' सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. घरात दिले जाणारे टास्क प्रेक्षकांना चांगलेच पसंतीस पडत असून टास्क जिंकण्यासाठी सदस्यांची होणारी धावपळ पहायला प्रेक्षकांना आवडत आहे. बिग बॉसच्या घरात नुकतंच 'संयमाची ऐशी तैशी' हा टास्क खेळण्यात आला. या टास्कमध्ये एक टीम राक्षस बनली होती तर दुसरी टीम देवदूत बनली होती. यात राक्षस देवदूतांना काम सांगणार आणि ती कामं देवदूतांनी हसत पूर्ण करायची होती. तर या टास्कदरम्यान मीनल शाह Meenal Shah हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

'संयमाची ऐशी तैशी' या टास्कमध्ये मीरा जगन्नाथ राक्षस बनली होती तर मीनल देवदूत होती. त्यामुळे मीनलला टास्कमधून बाहेर काढण्यासाठी मीराने तिला केस कापून टक्कल करण्याचा आदेश दिला. ट्रीमरने सगळे केस काढून टक्कल करायचं असं मीराने मीनलला सांगितलं. त्यावर मीनलने देखील टक्कल करण्याची तयारी दाखवली होती. पण मीनल टक्कल करणार तेवढ्यात मीराने तिला थांबवलं. मात्र मीनलच्या या धाडसीपणाचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. मीनलने न घाबरता मीराचं आव्हान स्वीकारलं आणि ते पूर्ण करण्याची धमक दाखवली, याबद्दल नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीनलचं भरभरून कौतुक केलं आहे.

एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, 'जिंकलंस. तुझा खेळ पाहून खूप छान वाटलं. तू एकटी तिथे सगळ्यांवर भारी पडतेस.' आणखी एका युझरने लिहिलं, 'मीनलने जेवढ्या धाडसाने हे आव्हान स्वीकारलं त्याला सलाम. एखाद्याने यावर खूप विचार केला असता. पण मीनल तू ग्रेट आहेस.' तर दुसरीकडे मीराने मीनलला असं विचित्र काम दिल्याने नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. 'मीरा तुला दुसरा टास्क देता आला असता, एक मुलगी असून दुसऱ्या मुलीला टक्कल करायला सांगतेस. तू अजुन किती खालच्या पातळीला जाणार आहेस, इतकी घाणेरडी गोष्टी फक्त तूच करू शकतेस.' असं म्हणत नेटकऱ्यांनी मीरावर राग व्यक्त केला. तर मीरासोबतच तृप्ती देसाई, विकास आणि विशालवरदेखील नेटकरी संतापले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Gift: टीव्ही 10,000 रुपयांपर्यंत स्वस्त होणार; एसी आणि गाड्यांच्या किमतीही कमी होणार, काय आहे कारण?

Latest Marathi News Live Updates : मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प, ठाण्यात प्रवासी रुळावर उतरले

Kolhapur Highway Flood : कोल्हापुरात राष्ट्रीय महामार्गावर पाणी, कोकणात जाणारे दोन घाट बंद; अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

वोटिंग मशिन चुकीचे, महाग अन् वादग्रस्त; वॉटरमार्क पेपरवर मतदान घेणार; ट्रम्प यांची मोठी घोषणा

'माजी मंत्री बाळासाहेब थोरातांना जिवे मारण्याची धमकी', कीर्तनकार भंडारेंच्या व्हिडिओने राज्यभर खळबळ..

SCROLL FOR NEXT