Vishal Nikam, Sonali Patil
Vishal Nikam, Sonali Patil 
मनोरंजन

BBM 3: विशाल-सोनालीवर चढतोय प्रेमाचा रंग; चाहत्यांना आवडतेय जोडी

स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीचं घर आणि प्रेम या दोन गोष्टी अतूट आहेत. पहिल्या दोन सिझनमध्येही बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये प्रेमाचं नातं फुलल्याचं पहायला मिळालं. हीच बाब आता तिसऱ्या सिझनमध्येही पहायला मिळतेय. विशाल निकम Vishal Nikam आणि सोनाली पाटील Sonali Patil हे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमधील सर्वांत लोकप्रिय स्पर्धक आहेत. याच दोघांवर सध्या प्रेमाचा रंग चढतोय. विशेष म्हणजे चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडतेय. कलर्स मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवर या दोघांचा एक प्रोमो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर चाहत्यांनी दोघांना पाठिंबा दिला आहे.

'आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट प्रोमो' असं एकाने लिहिलंय. तर 'तुमच्या दोघांच्या नुकत्याच सुरू झालेल्या कोमल निरागस मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असलेलं हे नातं आम्हा सर्वांना बघायला खूप आवडणार आहे. विशाल आणि सोनाली, असेच प्रामाणिक खेळा आणि बंध रेशमाचे या मैत्रीचे शहारे बिग बॉसच्या घरात पसरु द्या,' अशी कमेंट दुसऱ्याने केली आहे. 'या दोघांच्या जोडीला कोणाची नजर लागू नये' असंही चाहत्याने लिहिलंय.

बिग बॉसच्या घरात नुकताच 'बीबी कॉलेज' हा टास्क पार पडला. दादूस यांच्या क्लासमध्ये संगीताची मैफल रंगली, तर आदिशने गायत्रीला खळखळून हसवलं. सोनालीने बीबी कॉलेजच्या टास्कमध्ये घरातील स्पर्धकांना प्रेमाचे धडे दिले. यावेळी जय-स्नेहा, सोनाली-विशाल या जोड्यांना इतर सदस्यांकडून खूप चिडवलं जातं. विशाल-सोनालीचा रोमँटिक अंदाज पहायला चाहत्यांनाही आवडतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT