Trupti Desai, Meera Jagannath 
मनोरंजन

Bigg Boss Marathi 3: 'मीराच डबल ढोलकी'; नेटकऱ्यांनी घेतली तृप्ती देसाईंची बाजू

मीरा जगन्नाथ आणि तृप्ती देसाईंमध्ये जोरदार भांडण

स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी ३चा प्रत्येक एपिसोड रंगत चालला आहे. बिग बॉसकडून दिले जाणारे टास्क, स्पर्धकांमध्ये होणारी चढाओढ, घरातील वावर या सर्व गोष्टींमुळे प्रत्येक एपिसोडनुसार मनोरंजनाचा डोस दिवसेंदिवस वाढत जातोय. कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉस मराठीचे प्रोमो नियमितपणे पोस्ट केले जातात. त्यावर प्रेक्षक आणि बिग बॉसचे चाहते आवर्जून प्रतिक्रिया देत असतात. अनेकदा स्पर्धकांना ट्रोलही केलं जातं, तर एखाद्या स्पर्धकावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतो. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये मीरा जगन्नाथ Meera Jagannath आणि तृप्ती देसाई Trupti Desai या दोघींमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पहायला मिळालं. मीराच्या दुटप्पी वागण्यावरून तृप्ती देसाईंनी संताप व्यक्त केला.

"एका आठवड्यात किती शब्द फिरवतेस. तू स्वत:लाच बिग बॉस समजते का? इथे १४ नाही, मी एकटीच खेळायला आली आहे असं तुला वाटतं का," अशा शब्दांत तृप्ती देसाईंनी मीराला सुनावलं. यावरून मीरानेही त्यांना उलट उत्तर दिलं. "म्हणते बायकांसाठी लढतेय, इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते ही बाई," असा टोमणा ती मारते. या दोघींच्या भांडणावर आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'काल मीरा म्हणाली की पोळ्या कशाला करायच्या, पोहे खातील सगळे. आता सुरेखा ताईंसमोर म्हणाली रोज रोज पोहे खाऊन कंटाळा येतो. चहा पोळी करायला हवी होती. मीरा डबल ढोलकी आहे," अशी कमेंट एकाने केली. तर मीराला एकदा नॉमिनेट कराच, असं दुसऱ्याने म्हटलं. मीरा चावडीवरही खोटं बोलते, असंही मत नेटकऱ्यांनी मांडलं. बिग बॉसच्या पहिल्या एपिसोडपासून मीरा सोशल मीडियावर चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात सतत भांडण करत असल्याने मीराला अनेकदा ट्रोल केलं गेलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: लातूरमध्ये निकालाआधीचा थरार! मतपेट्यांत कैद झालेले भवितव्य आज उघडणार

Zilla Parishad Elections Result : निकालाआधीच महायुतीने मारली बाजी, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या २७ जागा बिनविरोध, पाहा विजयी उमेदवारांची यादी!

ZP election counting update : कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल किती वाजता लागणार?, प्रशासनाची जय्यत तयारी

Sindhudurg ZP Election Results : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांचा कौल कुणाला? आज चित्र होणार स्पष्ट; सावंतवाडीत सर्वाधिक ६९.८४ टक्के मतदान

Satara ZP Election Results : राजकारणातला 'गब्बर' साताऱ्यात बाजी मारणार? बहुमतासाठी 33 जागांचं गणित; पहिला निकाल 11 पर्यंत लागणार!

SCROLL FOR NEXT