मनोरंजन

BBM 3: दादूसच्या पत्नीची चिंता; बीपी-शुगर असतानाही पूर्ण केला टास्क

स्वाती वेमूल

बिग बॉसच्या घरात Bigg Boss Marathi 3 वेगवेगळ्या स्वभावाची माणसं तब्बल ९० दिवस एकत्र राहण्यासाठी येतात. यापैकी काहींची एकमेकांसोबत गट्टी जमते तर काही एकमेकांचे कट्टर वैरी होतात. ९० दिवस कार्यक्रमात टिकून राहण्याचं आव्हान सहभागी होणाऱ्या प्रत्येक कलाकारासमोर असतं. त्यातही बिग बॉसची आज्ञा पाळत त्यांनी दिलेले टास्क इमाने इतबारे पूर्ण करत स्वत:ला सिद्ध करून दाखवायची चुरस या सगळ्याच सदस्यांमध्ये असते. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला. यामध्ये घरी आलेल्या पाहुण्यांना सर्वांत वाईट पदार्थ तयार करून खायला द्यायचा होता. या टास्कमध्ये अक्षय वाघमारे Akshay Waghmare याने दादूस Dadus यांना कारलं, गरम मसाला, अंडं, मिरची आणि भरपूर मीठ घातलेला एक पदार्थ तयार करून दिला. विशेष म्हणजे दादूस यांनीसुद्धा कोणतीही तक्रार न करता तो पदार्थ खाल्ला. दादूसच्या खिलाडू वृत्तीची सारेच सध्या चर्चा करतायत.

दादूसला तो पदार्थ खाताना पाहून घरातील इतर सदस्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अखेर बिग बॉस यांनी दादूस यांना थांबवत तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं. या टास्कमध्ये दादूस यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र दादूस यांच्या पत्नीने त्यांच्या तब्येतीची काळजी व्यक्त केली. यासंदर्भात ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत योगिता म्हणाल्या, "त्यांना ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास आहे. असं असूनही त्यांनी टास्कमध्ये अत्यंत खारट पदार्थ खाल्ला. आम्हाला त्यांच्या तब्येतीची खूप काळजी वाटत आहे. घरी त्यांच्या जेवणात मिठाचा वापर खूप कमी केला जातो. त्यांच्यासाठी आम्ही वेगळं जेवण बनवतो. मात्र त्यांनी टास्कमध्ये तो पदार्थ कसा खाल्ला याचंच मला खूप आश्चर्य वाटतंय. ते पदार्थ खाताना घरातील काही सदस्य रडले, आमचीसुद्धा तशीच अवस्था झाली होती."

दादूस यांनी बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय का घेतला याविषयी योगिता यांनी पुढे सांगितलं, "त्यांना ही संधी अचानकच मिळाली. ते कामात इतके व्यग्र असतात की टीव्हीवरचे कार्यक्रम फारसे पाहत नाहीत. त्यांना जेव्हा बिग बॉसची ऑफर मिळाली, तेव्हा मी आणि माझ्या मुलीने त्यांना खूप आग्रह केला. आम्ही दोघी हा कार्यक्रम नेहमी पाहतो. दुसऱ्या सिझनसाठीही त्यांना विचारण्यात आलं होतं. मात्र तेव्हा ते कामात व्यग्र होते."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT