Sneha Wagh, Jay Dudhane 
मनोरंजन

BBM3: आधी रोमान्स, आता तिरस्कार.. स्नेहाने जयला सुनावले खडेबोल

बिग बॉसच्या घरात तीन जुन्या सदस्यांची एण्ट्री होणार आहे.

स्वाती वेमूल

गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठी ३ Bigg Boss Marathi 3 मधून कोणताच सदस्य घराबाहेर पडला नाही. मीरा जगन्नाथ घराबाहेर जाणार असं वाटत असतानाच तिला एक चिठ्ठी मिळाली, ज्यात फसवलं असं लिहिलं होतं. सोमवारच्या भागात घरातील सदस्यांना मोठं सरप्राइज मिळणार आहे. कारण बिग बॉसच्या घरात जुन्या तीन सदस्यांची एण्ट्री होणार आहे. स्नेहा वाघ Sneha Wagh, आदिश वैद्य Aadish Vaidya आणि तृप्ती देसाई Trupti Desai पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात येणार आहेत. हे तिघं पुन्हा घरात गेल्यानंतर सदस्यांमधील नाती किती बदलणार, घरातील समीकरणं कशी बदलणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पहायला मिळेल.

या आगामी भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस जाहीर करतो की, घरात नवीन सदस्य येणार आहेत. बिग बॉसच्या घोषणेनंतर स्नेहा, आदिश आणि तृप्ती देसाई घरात येतात. घरात येताच स्नेहाने जय दुधाणेवर निशाणा साधला. "या घरात सुरुवातीपासूनच जो माझ्यासोबत गेम खेळत होता, तो फक्त जय दुधाणे होता. आपलेच मित्र आपल्या मागून आपलाच इतका अपमान नाही करत", अशा शब्दांत स्नेहाने जयला सुनावलं.

बिग बॉसच्या घरातील स्नेहा आणि जय यांच्यामधील रोमान्स प्रेक्षकांनी पाहिला होता. घरात असताना हे दोघं एकमेकांशी प्रेमाने वागत होते. मात्र स्नेहा घरातून बाहेर पडल्यानंतर तिला जयची वेगळीच बाजू पहायला मिळाली. यावरूनच ती जयला सुनावते. बिग बॉसच्या घरात हे तीन सदस्य गेल्यावर अजून काय घडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 'ई टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार येत्या २६ डिसेंबर रोजी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये पाच नव्हे तर सहा स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंतचा प्रवास करणार असल्याचं कळतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT