Sonali Patil file
मनोरंजन

'बिग बॉस'च्या घरातून सोनालीची एग्झिट; चाहत्यांसह महेश मांजरेकरांनाही धक्का

या सीझनमधील हे सर्वात धक्कादायक एलिमिनेशन असल्याचं मत मांजरेकर यांनी मांडलं.

स्वाती वेमूल

बिग बॉस मराठी ३ (Bigg Boss Marathi 3) सध्या अंतिम टप्प्यात आलं असून रविवारी आणखी एका स्पर्धकाने या शोला निरोप दिला. यंदाच्या सीझनमधील लोकप्रिय स्पर्धक सोनाली पाटील (Sonali Patil) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. जवळपास ९० हून अधिक दिवस सोनाली बिग बॉसच्या घरात होती आणि ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणाऱ्या स्पर्धकांमध्ये तिचं नाव आवर्जून असेल असं अनेकांना वाटलं होतं. सोनालीच्या एलिमिनेशनमुळे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांना सुद्धा धक्का बसला. या सीझनमधील हे सर्वात धक्कादायक एलिमिनेशन असल्याचं मत मांजरेकर यांनी मांडलं.

भावूक झालेल्या सोनालीने घराबाहेर पडण्यापूर्वी इतर स्पर्धकांची भेट घेतली. यावेळी सर्वचजण भावूक झाले होते. महेश मांजरेकर यांनी शनिवारच्या चावडीत नॉमिनेट झालेल्या ४ स्पर्धकांसाठी ४ बॅग्स पाठवल्या होत्या. विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील हे ४ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. ज्या स्पर्धकाला त्याची बॅग परत मिळणार नाही तो घरातून बाहेर जाईल, असं मांजरेकर यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे सोनालीला तिची बॅग परत मिळाली नाही आणि तिला घरातून बाहेर जावं लागलं.

सोनालीने बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीपासूनच आपली वेगळी छाप सोडली होती. सोशल मीडियावर तिची नेहमी चर्चा असायची. कोल्हापुरी लहेजा आणि अफलातून नृत्य कौशल्य यांनी तिने चाहत्यांची मनं जिंकली होती. विशाल निकम आणि विकास पाटील यांच्यासोबतची तिची मैत्री आणि वाद नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करायचे.

बिग बॉस मराठी ३ मध्ये आता अंतिम ६ स्पर्धक राहिले आहेत. यामध्ये विशाल निकम, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, मीनल शाह, जय दुधाणे आणि मीरा जगन्नाथ यांचा समावेश आहे. या सहा जणांपैकी कोण बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT