Bigg Boss Marathi 4 akshay kelkar express his feelings about mother and father was separated  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: हर मर्द को दर्द होता है! म्हणत अक्षय केळकर ढसाढसा रडला..

बिग बॉस मराठीच्या कलाकारांना मिळणार कुटुंबीयांना पाहण्याची संधी..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: 'बिग बॉस मराठी'मध्ये दिवाळीचे दणक्यात सेलिब्रेशन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा टास्क, राडे, वाद याला सुरुवात झाली आहे. बिग बॉसने स्पर्धकांपुढे एक मोठा पेच टाकला आहे. 13 स्पर्धकांपैकी मोजक्याच स्पर्धकांना आपल्या घरच्यांशी बोलायची संधी मिळणार आहे. पण त्यासाठी स्पर्धकांनी आपापसातच ठरवायचे आहे, ही कोण आपल्या घरच्यांशी बोलायचं आहे. यावरून घरात मोठे इमोशनल वातावरण झाले आहे.

(Bigg Boss Marathi 4 akshay kelkar express his feelings about mother and father was separated )

बिग बॉसच्या आदेशानंतर प्रत्येकजण आपआपल्या आई वडिलांविषयी बोलत आहे. अपूर्वा म्हणते माझी आई घरी एकटी आहे, मला प्लीज तिच्याशी बोलू द्या, आणि ती रडू लागली. यावर विकास देखील आईच्या आठवणीत भाऊक झाला, पण अक्षय केळकर मात्र खूपच भाऊक लागला. कारण त्याचे आई वडील एकमेकांशी मतभेद असल्याने वेगळे राहतात. त्यामुळे त्याच्याशी आई बोलणार की बाबा ही देखील त्याला माहीत नाही. म्हणून तो धायमोकळून रडतो. त्याचे हे रूप पाहून सगळेच हादरतात. त्याच विषय आज अक्षय बोलताना दिसणार आहे.

यावरून योगेश अक्षयला रडूबाई म्हणाला. अक्षय त्याबाबत अमृता आणि समृद्धीशी चर्चा करताना दिसणार आहे. अक्षय म्हणतो, 'तुम्हांला माहिती आहे मला तो काल काय म्हणाला ? तू खरंच रडूबाई आहेस रे, नाटक करतोस. नाटक करायचं असतं तर मी काल आई बाबांचा फोटो घेऊन रडत बसलो असतो ड्रामा संपल्यानंतर. हर मर्द को दर्द होता है, और में वो छुपाने वाला मर्द नही हूं!' समृद्धीचे म्हणणे आहे, 'तो चांगला माणूस आहे, त्याचा पण struggle आहे.' अक्षय म्हणाला, 'पण असं म्हणणं चुकीचे आहे ना ?'

अमृता म्हणाली, 'आम्ही तिघे जरी बसलो असू ना तरी तो म्हणे तू beautiful आहेस, तू हॉटच आहेस मग तिला सारखं बोलत बसायचं. मी काय बावळट आहे का? ती सगळ्यांपेक्षा उजवी आहे असेल तिचा स्वभाव आहे चांगला... मला देखील मान्य आहे मी मैत्रीण आहे तिची. पण हे काय आहे दरवेळेस. मला म्हणे हीचा स्वभाव चांगला आहे तुझं बोलणं चांगलं नाही. मी म्हंटलं माझं बोलणं असंच आहे. मी तोंडावर बोलते जे काही असेल ते मला नाही जमंत...' अमृतानेही योगेशविषयी आपल्या भावना व्यक्त केली. आता आज रात्री त्यावरून काय राडा होणार आहे हे कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT