Bigg Boss Marathi 4 amruta dhongade and akshay kelkar fight between see saw task sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: अमृता धोंगडे आणि अक्षय केळकर यांच्यात मोठा राडा..

'सी-सॉ' टास्कमध्ये एमकेमएकांच्या वस्तू उद्ध्वस्त करण्याचा डाव, अमृता-अक्षय यांच्यात जुंपली..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: सध्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात 'महाटास्क'सुरू आहे. या टास्कचे नाव आहे 'सी सॉ'. या टास्क दरम्यान स्पर्धकांना युक्ती आणि शक्ती या दोन्हींचा कस सदस्यांना लावला लागला. या टास्कमध्ये एकमेकांच्या वस्तू उद्ध्वस्त करणं आणि सी-सॉ वर बसलेल्या सदस्याला कोणत्याही मार्गाने उठवणं असले प्रकार झाले. यामध्ये सदस्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. अशाच एका प्रसंगी अक्षय केळकर आणि अमृता धोंगडे यांच्यात चांगलीच भांडणं लागली.

(Bigg Boss Marathi 4 amruta dhongade and akshay kelkar fight between see saw task)

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खरंच अमृता धोंगडे आणि अक्षय केळकर मध्ये मेकअप बॉक्स वरून मोठा राडा झाला. अमृताने अक्षयला बजावून सांगितले पाय नको मारुस मेकअप आहे माझा...अक्षय म्हणाला, पाय मुद्दाम मारला का तुझ्या मेकअपला ? अमृता म्हणाली, मी सांगून देखील पाय अजून तिथेच आहे तुझा? अक्षयचे यावर म्हणणे आहे मी मुद्दाम मारला का? पाय मारला हे वाक्य म्हणू नकोस ... अमृता म्हणाली, मग काय म्हणू ? दुसरं वाक्य काय आहे ?

अक्षय म्हणाला, पाय लागला असं म्हण... तुझ्यासारखा मूर्ख आहे का मी? चिटर कुठली रडी... आणि हे भांडणं असच सुरू राहिले... अमृता म्हणाली, तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. अक्षय म्हणाला, तेच म्हणणं आहे खूप फरक आहे आपल्यात म्हणूनच तुझ्याशी वाद नाही घालतं आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्क दरम्यान टास्कवरून होणारी भांडणं, मारामारी, शाब्दिक चकमक, आरोप - प्रत्यारोप हे होताना आपण बघत आलोच आहे. पण या टास्कसाठी मात्र सदस्य वाटेल ते करत होते. अगदी मिरचीची धुरी,गरम तेल, कचरा याचा वापर करून सदस्यांनी हा टास्क पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT