Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar and vikas kidding  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: चक्क वाघ बकरी एकसाथ, अपूर्वा आणि विकासमध्ये नवं नातं?

नेहमी रागात असणारी अपूर्वा आज चक्क हसताना आणि मस्करी करताना पाहून चाहत्यांना धक्का बसणार आहे.

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात भांडण, राडा हे तर होतंच पण या घरात प्रेम, मैत्री आणि नात्याचे बंधही विणले जातात. त्यामुळे वाद, भांडण यासोबत नात्यातला गोडवाही प्रेक्षकांना पाहायला आवडतो. अशीच काहीशी थट्टा मस्करी आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. गेली दोन आठवडे महेश सरांच्या रडारवर असलेली आणि कायम घरात वरच्या पट्टीत बोलणारी अपूर्वा नेमळेकर चक्क गोड गोड बोलत विकासची थट्टा करताना दिसणार आहे..

(Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar and vikas kidding )

या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच अपूर्वाच्या वागण्यात थोडासा बदल दिसतो आहे. अपूर्वाने आपला राग बाजूला सारून सगळ्यांशी जुळवून घ्यायच ठरवलेलं दिसत आहे. कालपासून तर (bigg boss marathi) घरामध्ये अपूर्वा आणि विकासची नोकझोक दिसून येतं आहे. काल देखील अपूर्वाने विकासला बजावले जर मला तुझ्याविषयी काही चुगली आली तर मी आहे आणि तू आहे... माझ्यासारखी वाईट कोणी नाही... अर्थात हे ती मस्करीमध्ये बोलली.

आजपण दोघांमध्ये मजेशीर गप्पा बघायला मिळणार आहेत. अपूर्वाने विकासला सांगितले’ “पुढच्या वेळेस मी जी पण ड्युटी घेईन ती नाही घेतलीस तर मी तुझे आभार मानेन”. विकासचे त्यावर म्हणणे आहे "जेवण मग ... ? त्यावर अपूर्वाने बजावले, "विचार पण नाही करायचा. मी खरंच सांगते माझ्याबरोबर किचन नाही घ्यायचा. मी अशी सुगरण नाहीये... मी आधीच सांगते आहे. विकास मित्रा मला खात्री आहे एक दिवस टास्कमध्ये तू मला पण उचलशील. या घरात कुठलाही पुरुष उचलू नाही शकला, तरी तू मला उचलशील... ज्याअर्थी तू माझी बॅग उचलीस त्याअर्थी...” विकास म्हणाला, “मला पण वाटतं आहे...” त्यावर अपूर्वाने विकासाला अपूर्वा भन्नाट उत्तर देते. ती म्हणते,"पण हि संधी मी तुला देणार नाही." हे ऐकताच सगळयांना घरात हसू फुटले. ही थट्टा मस्करी प्रेक्षकांना कधी वाटणार हे आज कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT