Bigg Boss Marathi 4, argument between tejaswini lonari and Amruta Dhongade Google
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: जीवाभावाच्या मैत्रिणीत फूट, कचाकचा भांडताना दिसल्या तेजस्विनी आणि अमृता धोंगडे

'बिग बॉस मराठी 4' दिवसेंदिवस घरातील वाद आणि टास्कमुळे रंगतदार होताना दिसत आहेत.

प्रणाली मोरे

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज दोन जिवलग मैत्रिणींमध्ये होणार आहे कडाक्याचे भांडण. काल यशश्रीने सदस्यांवर केलेला प्रॅन्क तिच्यावरच उलटला. प्रसाद तिच्यावर कमालीचा नाराज झाला. त्यानंतर अमृता धोंगडेने देखील प्रसादची खिल्ली उडवली. तिथे तिने तेजस्विनीला मध्ये आणले, ज्यावरून अमृता धोंगडे आणि प्रसाद मध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. आणि हया सगळ्यात प्रसाद बरोबर आहे असे कुठेतरी तेजस्विनीचे म्हणणे पडले. आज याच मुद्द्यावरून, झाल्या प्रकारावरून दोघींमध्ये कडाक्याचे भांडणं होताना दिसणार आहे. (Big Boss Marathi 4, argument between tejaswini lonari and Amruta Dhongade)

तेजस्विनी अमृताला सांगताना दिसणार आहे,'' मला जे खरंच लागलं आहे त्याला तू प्रॅन्क बोलीस मी खरं भांडायला पाहिजे. मी वेड्यासारखं तुझ्याकडे प्रेमाने आले, तर तू ओरडून बोलतेयस त्याच्यावर ... काय संबंध ? त्याला ओरडून सांगायची काय गरज ? तो कुठल्या मूडमध्ये आहे, तो तिथे डिस्टर्ब आहे''. अमृता म्हणाली, ''अगं मी मस्करी करत होते. तुझ्यावरून नाही बोलले मी''.

हेही वाचा: का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

तेजस्विनी म्हणाली, ''मला त्याचं कारण valid वाटतं, तो झोनच वेगळा आहे, त्या माणसाला बोलावून दुसऱ्याच्या प्रॅन्क बद्दल का बोलायचं, काही संबंधच नाहीये''. त्यावर अमृता धोंगडे म्हणाली, ''त्याने खूप विषय वाढवला''. मग तेजस्विनी म्हणाली,'' एकाच बाजूने नव्हतं, तू पण बोलत होतीस''. अमृता म्हणाली, ''तो किती बोलला मला. हे शेवटचं बोललीस मला..'' तेजस्विनीचे म्हणणे आहे, मुद्दा वाढवायची गरजचं नाहीये हा…

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT