Bigg Boss Marathi 4 captaincy task for second week captain rohit shinde and akshay kelkar  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: ज्याच्याकडे पार्किंग तोच होणार घराचा कॅप्टन, काय आहे प्रकरण?

आज रंगणार पार्किंग किंग हे कॅप्टन्सी कार्य..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चा खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन 9 दिवस उलटले असून आता घरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घरात लवकरच गट पडतील असेल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता घरात खरे ट्विस्ट येतील असे दिसते आहे. त्यातही दुसऱ्या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण होतोय यासाठी स्पर्धकांमध्ये चुरस लागली आहे. बिग बॉसनेही एक भन्नाट कॅप्टीन्सी कार्य स्पर्धकांना दिले आहे. बघूया काय आहे ते..

बिग बॉसच्या घरात कॅप्टन होणं हे अत्यंत मानाचं मानलं जातं. पहिल्या आठवड्यात हा मान समृद्धी जाधव हिने मिळवला होता. जी सदस्य कॅप्टन होतो तो नॉमिनेशन पासून सेफ होतो. त्या आठवड्यात तो सुरक्षित असल्याने घराबाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक सदस्य कॅप्टन होण्यासाठी चढाओढ करत असतो. यंदा बिग बॉस मराठीच्या घरातील दुसरा कॅप्टन निवडण्यात येणार आहे. यासाठी 'पार्किंग किंग' हे कॅप्टन्सी कार्य दिले आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य ! काल कॅप्टन पदासाठी रोहित आणि अक्षय असे दोन उमेदवार मिळाले आहेत. आज या दोघांमध्ये रंगणार आहे कॅप्टीन्सी कार्य. कोणाची गाडी पार्क होणार आणि कोण कॅप्टन होणार हे आज कळेल. यासाठी दोन्ही स्पर्धकांना आणि त्यांच्या टीमला हा भन्नाट टास्क खेळायचा आहे. हे करताना भांडणं, मारामारी, होणार हे नक्की. तसे दृश्य प्रोमोमध्येही दिसले आहे. त्यामुळे अक्षय आणि रोहित मध्ये नेमकी कशी खडाजंगी होणार आणि कोण विजेता होणार हे आज कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात केलं दाखल; उपचार सुरू

CJP Protest: भारतातील आंदोलनांना खरंच अमेरिकेतून फंडिंग? प्रसिद्ध गायिकेने थेट उद्योगपतीचं नाव घेत केला आरोप

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना लुटणाऱ्या टोळीकडून २१ लाखांचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील टोळीवर फरासखाना पोलिसांची कारवाई

Dive Ghat Close : पालखी महामार्गाच्या कामासाठी दिवेघाट दोन तास बंद

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

SCROLL FOR NEXT