Bigg Boss Marathi 4 first chavdi weekend cha dav saturday episode mahesh manjrekar sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: आज 'बिग बॉस मराठी'ची पहिली चावडी, मांजरेकर कुणाची घेणार शाळा!

पहिल्याच आठवड्यात सदस्यांनी राडा घातला, आज येणार खरा चेहरा समोर येणार!

नीलेश अडसूळ

bigg boss marathi S 4 : बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा ट्विस्ट येत आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन पाच दिवस झाले नाही तोवरच वाद आणि भांडणांना सुरुवात झाली आहे. शिवाय वेगवेगळे टास्क, नाच-गाणी, गॉसिप, कॅप्टनसी टास्क यामुळे भलतीच रंगत येत आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व 2 ऑक्टोबर रोजी सुरू झाले. रविवारी 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला. पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात मनोरंजनाचे वारे वाहू लागले आहे. शिवाय प्रत्येकाची गुपितंही बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. पण प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात ती शनिवारची. म्हणजे बिग बॉसच्या चावडीची. महेश मांजरेकर सदस्यांची कशी शाळा लावतात हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. आज ८ ऑक्टोबर रोजी बिग बॉस च्या घरातली पहिली चावडी भरणार आहे. (Bigg Boss Marathi 4 first chavdi weekend cha dav saturday episode mahesh manjrekar)

आज या पर्वातील पहिली चावडी भरणार आहे. तसेच सदस्यांचे खरे चेहरेदेखील समोर येणार आहेत. नुकताच 'बिग बॉस मराठी'च्या आगामी भागाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये महेश मांजरेकर म्हणत आहेत," मित्रांनो बघितलं ना आठवडाभरात यांना कसे एकाहून एक जबरदस्त धक्के बसलेत. जोशमध्ये गेलेल्या सर्वांचे चेहरे पहिल्याच आठवड्यात समोर येऊ लागलेत. सगळ्याचा जाब विचारला जाणार आहे. भेटूयात बिग बॉस मराठीच्या चावडीवर". हा प्रोमो प्रचंड व्हायरल झाला आहे.

महेश मांजरेकरांना ऐकणे आणि त्यांनी स्पर्धकांची घेतलेली फिरकी पाहणे ही एक पर्वणी असते. बिग बॉस मराठीचे तिन्ही पर्व महेश मांजरेकरांनी चांगलेच गाजवले आहेत. त्यांची बोलण्याची आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची शैली प्रेक्षकांना विशेष भावते. ते जेव्हा एखाद्या स्पर्धकाला रागावतात तेव्हा आपल्यालाही भीती वाटते. अगदी पुरावे घेऊन ते समोर उभे असतात. यंदाच्या पर्वातली ही पाहिलीच शाळा असल्याने मांजरेकर कुणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

Vladimir Putin India visit : ब्रिक्स परिषदेसाठी पुतिन दिल्लीत दाखल; मोदींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, ७ वर्षांनंतर शी जिनपिंगही भारतात येणार

SCROLL FOR NEXT