bigg boss marathi 4 first task who is useless apurva nemlekar kiran mane fight first day sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: मी इथे कोणाची मनं जपायला आली नाहीये.. शेवंताने सुनावले..

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने पाहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात आपला करारी बाणा दाखवून दिला.

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: "ALL IS WELL" म्हणतं काल बिग बॉस मराठीच्या घराचा दरवाजा उघडला. संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता बिग बॉस मराठीच्या सिझन चौथामध्ये कोण सदस्य असतील ? अखेर काल त्या बातम्यांना, चर्चेला पूर्णविराम लागला १६ सदस्यांची काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री झाली. आजपासून १०० दिवस १६ सदस्य कॅमेराच्या काय तर महाराष्ट्राच्या नजरकैदेत असणार असं म्हणायला हरकत नाही. घरात प्रवेश होताच एकमेकांबद्दल कुरघोड्या आणि टीका सुरु झाल्या. आता खरंच सगळं "ALL IS WELL" असेल का हे लवकरच कळणार आहे. नुकताच एक प्रोमो समोर आला असून सदस्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे दिसून येत आहे, याचसोबत मतभेद देखील झाले.

(bigg boss marathi 4 first task who is useless apurva nemlekar kiran mane fight first day)

काल दमदार नृत्य करत 16 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली. यामध्ये अपूर्वा नेमळेकर, किरण माने, तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखिल राजेशिर्के. अमृता धोंगदे, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशश्री मसूरकर, विकास सावंत, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, डॉ. रोहित शिंदे अशा सोळा स्पर्धकांचा समवेश आहे. यातील काही चेहरे आपल्याला परिचित आहे. तर काही चेहरे हे कायमच वादग्रस्त चेहरे म्हणून समोर आले आहेत. आता पहिल्याच दिवशी ते काय राडा करणार हे लवकरच कळेल.

पहिल्या दिवशी बिग बॉसने या 16 जणांमध्ये चार ग्रुप केले. त्यानुसार प्रत्येक गटात 4 खेळाडू आहे. आता या चार खेळाडूंनी मिळून ठरवायच आहे की आपल्या गटात कोणता खेळाडू निरुपयोगी आहे. नुकताच वाहिनीने एक प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये बिग बॉस आपल्या आवाजात म्हणतात प्रत्येक गटातील चारही सदस्यांनी मिळून ठरवायचं आहे की आपल्या गटातील कोणता खेळाडू निरुपयोगी आहे.

यावर सर्वांची लाडकी शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने थेट प्रसादचे नावं घेतले. एवढेच नाही तर तिने स्पष्टपणे सांगितले की, "मी इथे कोणाची मनं जपायला आली नाहीये". त्यामुळे त्यांच्यात आता मोठे मतभेद होणार हे नक्की. शिवाय त्रिशूलने किरण माने यांचं नाव निरुपयोगी सदस्य म्हणून नाव घेतलं. त्यामुळे पहिल्याच दिवशी काय राडा होणार हे बघण्यासारखे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT