Bigg Boss Marathi 4 nomination task vish amrut  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4:असं विष-अमृत खेळलंय का कधी? असे आहे या आठवड्याचे नॉमिनेशन कार्य

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात आले नवे कॅप्टनसी कार्य, पाहून बसेल धक्का!

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चे चौथे पर्व चांगलेच रंगत आहे. कालच बिग बॉसच्या घरातील तिसरा सदस्य घराबाहेर गेला. त्यात एक नवीन सदस्यही आला त्यामुळे आता अधिकच आव्हान वाढले आहे. एलिमिनेशन नंतर येतो तो नॉमिनेशन टास्क. आजच्या भागात रंगणार आहे 'विष अमृत' हे नॉमिनेशन कार्य. या कार्यात मोठा राडा पाहायला मिळणार आहे.

(Bigg Boss Marathi 4 nomination task vish amrut )

बिग बॉस मराठीचा खेळ सुरू होऊन आता चार आठवडे झाले. टास्क, वाद भांडण आणि राडे यांचे सत्र सुरूच आहे. कुरघोडी, एकमेकांवर गेम करणे हे सुरूच आहे. पण आपल्याला नको असलेल्या सदस्याला थेट घराबाहेर काढण्याची संधी बिग बॉसने सर्व सदस्यांना दिली आहे. त्यासाठी एक भन्नाट नॉमिनेशन कार्य बिग बॉसने दिले आहे. त्या कार्याचे नाव आहे 'विष अमृत'

आपण सर्वचजन लहानपणी विष अमृत हा खेळ खेळलो आहोत. पण हा खेळ काहीसा वेगळा आहे. इथे विष मिळवण्यासाठी अक्षरशः झगडावं लागणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामधून काल योगेश जाधवला बाहेर पडावे लागले आणि घरामध्ये झाली सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणजेच स्नेहलता वसईकर. त्यामुळे आता तिच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलणार ही नॉमिनेशन कार्यात कळेल.

नुकत्याच समोर आलेल्या प्रमोमध्ये बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपावले आले आहे विष - अमृत हे नॉमिनेशन कार्य. बिग बॉस यांनी जाहीर केले, "जो सदस्य पेटारा उघडुन त्यातील विष मिळवेल तो ठरवेल विरोधी टीममधील कोणता सदस्य नॉमिनेट होईल". त्यामुळे समोरच्या टीमला कमकुवत करण्याची ही नामी संधी आहे. बघुया यात कोणती टीम बाजी मारणार ? आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Firing : राष्ट्रीय स्वयंसेवक मुख्यालय परिसराजवळ मध्यरात्री गोळीबार, सहा जण बाईकवर आले अन्...

Sindhudurg Tourism: सिंधुदुर्ग सागरी पर्यटनासाठी ऐतिहासिक पाऊल!समुद्रात उतरणार पर्यटनाचा ‘गुलदार’; निवती येथे साकारणार पाण्याखालील संग्रहालय..

Lal Khurma: कुशीनगरचा 'लाल खुरमा' बनणार ग्लोबल ब्रँड! 'ODOC'मध्ये युपीच्या या पारंपरिक मिठाईची हवा; जाणून घ्या काय आहे खास!

Vidarbha: विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा चटका, अकोला-वर्धा ४६ अंशावर; चार दिवस यलो अलर्ट

US Iran Talks: अमेरिकेच्या इराणसमोर पाच अटी; वाटाघाटींसाठी युरेनियम, अणुप्रकल्पाच्या मुद्द्यांवर भर..

SCROLL FOR NEXT