Bigg Boss Marathi 4: Rohit Shinde Exit, First post of rohit after exit, ignore girlfriend ruchira jadhav stagram
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: घराबाहेर पडल्यावर रोहित शिंदेची पोस्ट चर्चेत,गर्लफ्रेंड रुचिराला केलं टोटल इग्नोर..

रुचिरा जाधवनं घराबाहेर पडल्यावर अनेक बाबतीत रोहितला दोष दिला होता,त्यामुळे बिग बॉसच्या घरातच दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती.

प्रणाली मोरे

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या आठवड्यात चार वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्या होत्या,ज्यानं खेळात रंजकता आलेली आपण सगळ्यांनीच पाहिली असेल. त्यांच्या येण्याने खेळात धम्माल तर आणलीच,शिवाय घरातील सदस्यांची नाती बदलताना दिसली. नव्या सदस्यांच्या घरात येण्याने खेळ बदलताना दिसत होता...

पण तेवढ्यातच बिग बॉसच्या चावडी मध्ये प्रेक्षकांना तसेच घरातील सदस्यांना खूप मोठा धक्का बसला जेव्हा महेश सरांनी विशाल आणि मीरा यांना घरातून बाहेर येण्यास सांगितले आणि हे देखील म्हणाले कि हे दोघे एकाच आठवड्यासाठी घरात होते... तरीदेखील या आठवड्यात एक सदस्य घराबाहेर देखील जाणार हे निश्चित असं म्हणत त्यांनी रोहित शिंदेचं नाव जाहीर केलं

आणि चार नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी म्हणजेच अपूर्वा, प्रसाद, रोहित आणि अमृता देशमुख यांच्यापैकी रोहित शिंदेला घराबाहेर पडावे लागले.(Bigg Boss Marathi 4: Rohit Shinde Exit, First post of rohit after exit, ignore girlfriend ruchira jadhav)

महेश मांजरेकरांनी जेव्हा सदस्यांना विचारले तुमच्या मते कोणता सदस्य वजनदार ठरला ? त्यावर अमृता धोंगडे म्हणाली,'अपूर्वा मला कुठेतरी कमी वाटते...', त्यावर अपूर्वाचे म्हणणे पडले 'मी याच्याशी सहमत नाही...', यावर शांत बसेल ती अमृता कुठली..म्हणाली, 'मान्य न करणे हि मुळात चूक आहे आपण खेळाडू म्हणून उभं केलं आहे इथे आधी मान्य करायला शिका...', त्यावर अपूर्वा म्हणाली, 'तुला सांगायची गरज नाही ते माझं मी बघेन...'. आरोह, विकास, किरण माने, राखी, स्नेहलता यांनी अमृता देशमुखला वजनदार ठरवले... तर अपूर्वाला भार. मीरा, अक्षय, विशाल यांच्या मते अपूर्वा ठरली वजनदार. प्रसाद आणि रोहित मध्ये अक्षय, स्नेहलता, अपूर्वा, राखी, मीरा, अमृता देशमुख, यांनी रोहितला वजनदार ठरवले. तर किरण, अमृता धोंगडे यांनी प्रसादला वजनदार ठरवले. यात रोहित मागे पडला आणि त्याला घराबाहेर यावे लागले.

रोहित शिंदे घराबाहेर पडल्यावर काय प्रतिक्रिया देतो याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. ती या कारणानं कारण त्याची गर्लफ्रेंड रचिरा जाधव दोन आठवड्यापूर्वीच घराबाहेर पडली होती ती त्याच्यावर रागवून. त्यानंतर तिनं मीडियाला दिलेल्या अनेक मुलाखतीत रोहित विरोधात नाराजीचा सूर काढला होता. आता रोहितला याविषयी घराबाहेर पडल्यावर कळलं असणार हे नक्की. त्यामुळे त्याच्या घराबाहेर पडल्यावर पहिल्या पोस्टकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

डॉ.रोहित शिंदेनं घराबाहेर पडल्यावर एक व्हिडीओ पोस्ट केली आहे,ज्यात त्यानं सगळ्यांचे आभार,धन्यवाद मानले पण रुचिराचा साधा उल्लेखही केलेला नाही. यावरनं आता नेटकरी मात्र अंदाज बांधू लागलेयत की बहुधा रुचिरा आणि रोहितचे ब्रेकअप झाले आहे. आता खरं काय हे या दोघांनाच माहीत. तेव्हा वाट पहायची ते रोहित बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर रचिरा काय प्रतिक्रिया देते याची.

पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Reservation: राज्य सरकारला मोठा झटका! ६७% ओबीसी आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Prakash Londeh :'भूयार' सापडलेल्या परिसरात महापालिकेची कारवाई; लोंढे कुटुंबाच्या अडचणीत वाढ

फ्रेश लुक असलेला "लास्ट स्टॉप खांदा चित्रपटाचा टीजर लाँच; 'या' दिवशी येणार भेटीला

Ranji Trophy 2025 : अर्जुन तेंडुलकरच्या संघातून दोघांची द्विशतकं, गोवा संघाच्या ८ बाद ५५० धावा! सचिनच्या लेकाच्या यात किती धावा?

Diwali Makeup Tips: दिवाळीत मेकअप करताना या' चूका टाळा, अन्यथा त्वचा होईल खराब

SCROLL FOR NEXT