भर फेस्टिव्हलमध्ये अक्षयवर पाकिस्तानी चाहत्याचा आरोप; म्हणाला,'तू आमच्या देशा विरोधात...' Akshay Kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood:Pakistani Man claims bell bottom is against pakistan, akshay kumar reacts

Bollywood: भर फेस्टिव्हलमध्ये अक्षयवर पाकिस्तानी चाहत्याचा आरोप; म्हणाला,'तू आमच्या देशा विरोधात...'

Bollywood: बॉलीवूडचा खिलाडी कुमार अक्षयचे चाहते जगभरात आहेत. अक्षयने असे कितीतरी सिनेमे बनवले आहेत,ज्यात रोमान्स,अॅक्शन,कॉमेडीचा फुल्ल ऑन डोस असतो. अक्षयचे कितीतरी सिनेमे हे देशभक्तीनं भारलेलेच पहायला मिळतील. पण आता एका चाहत्यानं दावा केला आहे की अक्षयचा सिनेमा 'बेल बॉटम' पाकिस्ताच्या विरोधात बनवला गेला होता. या गोष्टीत किती तथ्य आहे याविषयी आता अक्षयनं स्वतः उत्तर दिलं आहे. (Bollywood: Pakistani Man claims bell bottom is against pakistan, akshay kumar reacts)

हेही वाचा: Vijay Sethupathi: विजय सेतुपतिच्या सिनेमाच्या सेटवर स्टंटमॅनचा मृत्यू, क्रेनला बांधलेल्या रशीनं केला घात

अक्षयने काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियात पार पडलेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. त्यावेळी बातचीत करताना सेशन दरम्यान एका व्यक्तीनं अक्षयला त्याच्या बेलबॉटम सिनेमा संदर्भात एक शॉकिंग प्रश्न विचारला. त्या व्यक्तीनं अक्षयला विचारलं की- 'मी पाकिस्तानातून आहे. तुझ्या शेजारील देशातून. माझी तुला एक विनंती आहे. तू पॅडमॅन आणि टॉयलेट सारखे दमदार सिनेमे बनवलेस. पण भारत आणि पाकिस्तान दरम्यान देखील वाद सुरु आहेत,ते तू पडद्यावर दाखवताना पाकिस्तान विरोधात थेट बोललास. तू काही दिवसांपूर्वी आलेल्या तुझ्या बेलबॉटम सिनेमात बऱ्याच गोष्टी पाकिस्तान विरोधात दाखवल्या होत्यास'.

हेही वाचा: Hansika Motwani Wedding: लाल रंगाच्या भरजरी लेहेंग्यात सजली हंसिका,मुंडोता फोर्टमधून लग्नाचे फोटो व्हायरल

त्या अक्षयच्या पाकिस्तानी चाहत्याच्या या दाव्यानंतर आता अभिनेत्यानं खूप समजूतदारपणे उत्तर दिलं आहे. अक्षय म्हणाला-''सर,तो फक्त एक सिनेमा आहे. त्याला घेऊन तुम्ही एवढं सिरीयस नका होऊ. तो फक्त सिनेमाच आहे''. अक्षय कुमारच्या 'बेलबॉटम' सिनेमाला रंजीत तिवारीनं दिग्दर्शित केलं होतं. सिनेमाची कथा इंडियन एअरलाइन्सच्या हायजॅक केलेल्या विमानासंदर्भात कथन करते,यामध्ये विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव वाचवण्याचं मिशन थोडक्यात दाखवण्यात आलं होतं.

बेलबॉटम सिनेमात अक्षय कुमारने एका इंडियन सीक्रेट एजंटची भूमिका साकारली होती. भारतात अक्षयच्या या सिनेमाला बऱ्यापैकी प्रेक्षकांनी पसंत केलेलं दिसून आलं होतं. पण त्याचवेळी काही देशांमध्ये मात्र सिनेमावरनं वाद छेडला गेला होता. कुवैत,कतार आणि सौदी अरेबिया सारख्या देशांनी अक्षयच्या बेलबॉटमवर बंदी आणली होती. सिनेमात अक्षय कुमार सोबत वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत होते.

हेही वाचा: Marathi Serial: स्वामी समर्थांशी तितिक्षाचं आहे खास नातं; अक्कलकोट मधला 'तो' अनुभव तुम्हालाही करेल थक्क..

अक्षयच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच सेक्स एज्युकेशनवर सिनेमा घेऊन आपल्या भेटीस येत आहे. रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्येच त्यानं आपल्या या नवीन सिनेमावर खुलासा केला. अक्षय म्हणाला की आता तो सेक्स एज्युकेशनसारख्या महत्त्वाच्या विषयावर सिनेमा बनवत आहे. अक्षय म्हणाला की हा सिनेमा मला समाजाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा वाटतो.