Bigg Boss Marathi 4 second week chawadi mahesh manjrekar slams all participants sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: आज कुणाची खैर नाही, मांजरेकर करणार सदस्यांची ऐशीतैशी..

आज रंगणार बिग बॉस मराठीची चावडी, गेल्या आठवड्यातला हिशोब होणार चुकता..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi S 4 : सध्या बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा ट्विस्ट येत आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता दोन आठवडे झाले आहेत. आज बिग बॉस च्या घराची दुसरी चावडी आहे. आज महेश मांजरेकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या आठवड्यात स्पर्धकांनी बराच राडा घातला आणि बरीच रडारड पण झाली. त्याचा हिशोब आज चुकता होणार आहे. आठवड्यात स्पर्धकांनी कितीही राडा घातला तरी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात ती शनिवारची. म्हणजे बिग बॉसच्या चावडीची. महेश मांजरेकर सदस्यांची कशी शाळा लावतात हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. आज दुसऱ्या चावडीत एकाची नाही तर सर्वांचीच खरडपट्टी मांजरेकर काढणार आहेत. नुकताच त्याचा प्रोमो समोर आला आहे. (Bigg Boss Marathi 4 second week chawadi mahesh manjrekar slams all participants)

कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चावडीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये मांजरेकर म्हणतात, 'या आठवड्यात सर्व स्पर्धकांनी कॉमन मॅन बनून घरात धुडगूस घातला. काही हवेत गेले तर काही रेल्वेच्या डब्यात लटकतात तसे लटकत राहिले. चला तर मग सगळ्यांना आणूया वठणीवर.. त्यासाठी भेटूया बिग बॉसच्या चावडीवर..' हा विडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. कारण या चावडीत मांजरेकरांच्या तावडीत कोण सापडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

तर आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये महेश सर रोहित शिंदेला झापताना दिसत आहे. महेश मांजरेकर म्हणतात, 'विकास आणि योगेशमुळे तू कॅप्टन झालास पण तू साध त्यांना पाणी सुद्धा विचारलं नाही. तू थेट जाऊन अक्षयला मिठी मारली. तू किती अनग्रेटफूल आहेस' अशा कडक शब्दात ते रोहितचा समाचार घेतात. आता अजून कुणकुणाची शाळा लागणार हे आजच्या भागात कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT