Bigg Boss Marathi 4 trishul marathe said to samruddhi jadhav you are my BFF sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: लागली प्रेमाची चाहूल? त्रिशूलनं समृद्धीला दिलं 'हे' वचन..

समृद्धी आणि त्रिशूलमध्ये लुटुपुटुच भांडणं, की प्रेमाला सुरुवात..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात भांडण, राडा हे तर होतंच पण या घरात प्रेम कधी आणि कुणाचं जुळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. बिग बॉस मराठीच्या प्रत्येक पर्वात असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रेमाचे बंध विणले गेले आहेत. मग वीणा- शिवचे नाते असो वा राजेश-रेशम किंवा रूपाली-पराग. अशा अनेक जोड्या प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात आता प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत असे दिसते. नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगातून याची चाहूल लागली आहे.

(Bigg Boss Marathi 4 trishul marathe said to samruddhi jadhav you are my BFF)

बिग बॉस मराठी'चा (bigg boss marathi 4) खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन 11 दिवस उलटले असून आता खरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. एकीकडे बिग बॉस च्या घरात गटबाजी, वाद टोक गाठत असतानाच कुठेतरी प्रेम जुळतय की काय असेही आश्वासक चित्र आहे. समृद्धी आणि त्रिशूल यांच्यातली मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे. आता या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

त्रिशूल तुला गर्लफ्रेंड मिळाली का असा प्रश्न महेश मांजरेकरांनी गेल्या आठवड्यात विचारला होता. त्यावर लवकरच काळवतो असे उत्तर त्रिशूलने दिले होते. आता खरच त्रिशूल समृद्धीच्या प्रेमात पडलाय की काय असे वाटत आहे. आजच्या भागात दिसेल की, समृद्धी त्रिशूलवर जरा नाराज आहे. ती त्याच्याशी बोलते की, 'या घरात तुला आता दुसरा BFF मिळाला आहे, मित्र खूप होऊ शकतात पण बेस्ट फ्रेंड एकच असतो.' त्यावर त्रिशुल म्हणतो, "पण तू तर म्हणाली अक्षय आहे ना तुझा BFF.” त्यावर समृद्धी म्हणाली, “नाही ... कोण बोलं तुला ?.. काल मी थोडी नाराज होती तुझ्या वागण्यामुळे म्हणून... त्रिशूल आता भांडेन मी तुझ्याशी. त्यावर त्रिशूल म्हणतो, 'मग भांडताना हसू नकोस... यू आर माय बीएफएफ (तूच माझी जवळची मैत्रीण आहेच)' असं तो म्हणतो. आता या नात्याला कोणतं वळण लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT