Bigg Boss Marathi Seaoson 4 esaka
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस ४’चा पहिला फायनलिस्ट समोर ..'या' स्पर्धकानं घेतली महाअंतिम सोहळ्यात झेप...

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी ४’ हा पर्व चांगलाच गाजत आहे. या सिझनने प्रेक्षकांच भरभरुन मनोरंजन केलं. या शोचा १०० दिवसांचा प्रवास पूर्ण व्हायला आता काही दिवस राहिले आहे. बिग बॉसचा खेळ आता ८८व्या दिवसावर आला असून, येत्या ८ जानेवारीला महाअंतिम सोहळा रंगणार आहे.

अंतिम फेरीत जाण्यासाठी स्पर्धक एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. गेल्या दिवसात या घरात मैत्री, राडा, भांडणं आणि धमाल सगळं प्रेक्षकांना पाहायला मिळालं.

या ट्रॉफीच्या शर्यतीत आता कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. आता या घरात अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, प्रसाद जवादे, किरण माने, अक्षय केळकर, आरोह वेलणकर या स्पर्धकांमध्ये ‘बिग बॉस’ ट्रॉफीच्या लढतीची शर्यत रंगणार आहे.

आता ‘बिग बॉस मराठी सीझन ४’ला त्याचा पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. बिग बॉसच्या घरात धान्याचा टास्क रंगला. या टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाई झाली. जिंकण्यासाठी प्रेक्षकांनी हद्दच पार केली.

दरम्यान हा टास्क जिंकून अपूर्वा नेमळेकर हिने तिकीट टू फिनाले पटकावलं आहे. धान्याच्या टास्कमध्ये अक्षय केळकर आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यात रंगलेल्या या सामन्यात अपूर्वानं बाजी मारली. आता अपूर्वाने ‘बिग बॉस मराठी ४’च्या महाअंतिम सोहळ्यात झेप घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT