Bigg Boss Marathi 4: Vikas Patil Post for rakhi sawant Google
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: पैसे घेऊन घराबाहेर पडलेल्या राखीसाठी विकास पाटीलनं केलेली पोस्ट चर्चेत..

'बिग बॉस मराठी 4' मधनं राखी सावंतनं नेहमी प्रमाणे डोकं चालवत ९लाख रुपये रोख रक्कम घेऊन शो मधून माघार घेतलेली सगळ्यांनी पाहिली अन् जोरदार चर्चा रंगली.

प्रणाली मोरे

Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी सिझन 4' चा फिनाले नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. शेवटपर्यंत कोण जिंकणार ही धाकधूक होती. शेवटच्या टॉप २ मध्ये अपूर्वा आणि किरण माने असतील असं वाटत असताा गेम पलटला अन् किरण माने तिसऱ्या क्रमांकावर बाद झाले.

त्यानंतर आता अपूर्वाच जिंकणार असा अंदाज मोठ्या प्रमाणात लावला जात असताना आयत्यावेळेस अक्षय केळकरला विनर म्हणून जाहीर केलं अन् अनेकांच्या भूवया उंचावल्या. पण या संपूर्ण धाकधूकी दरम्यान राखी लक्षात राहिली ते तिच्या मास्टर माईंडमुळे.

३० दिवसांत ९ लाख खिशात टाकत स्पर्धेतून माघार घ्यायच्या तिच्या निर्णयामुळे.(Bigg Boss Marathi 4: Vikas Patil Post for rakhi sawant)

राखीनं नऊ लाख घेत स्पर्धेतून माघार घेतली ही गोष्ट तशी काही नवीन नाही. तिनं हिंदी बिग बॉसमध्ये देखील अशीच रोख रक्कम घेऊन घराबाहेर पडणं योग्य समजलं होतं. पण आता यावरनं तिच्या विरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत तर काही जणं तिची प्रशंसा करताना दिसत आहेत. अभिनेता विकास पाटीलनं देखील राखीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची चर्चा रंगली आहे.

विकास पाटील स्वतः बिग बॉस मराठी ४ च्या फिनाले दरम्यान होता ज्यानं स्पर्धकांना ९ लाखाची ऑफर देणाऱ्या राऊंडचे सूत्रसंचालन केले होते.

विकासनं राखीसाठी केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,''आयुष्यात प्रत्येकवेळेस मनाचीच हाक न ऎकता कधीतरी बुद्धीच्या आवाजाला पण ओ द्यावी ...कित्येकदा तो आवाज तुम्हाला अनपेक्षित गोष्टी देऊन जातो 🎁

तू तेच केलंस आणि 9 लाख पदरात पाडून घेतलेस..''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT