bigg boss marathi 4 winner Akshay Kelkar shared emotional post after finale sakal
मनोरंजन

Akshay Kelkar: काहीना मी आवडलो नाही, मला माफ करा! बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकरची भावूक पोस्ट

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर झाला भावूक..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4 winner akshay kelkar: गेली काही दिवस ज्या खेळाने आपले लक्ष वेधले होते, त्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता आपल्याला मिळाला. 100 दिवस मनोरंजन, बुद्धी, टास्क, मेहनत या साऱ्याची जोड देऊन अक्षय केळकरने या खेळात बाजी मारली. अक्षय पहिल्या पासूनच या खेळात मास्टर माइंड म्हणून ओळखला गेला. त्याच्या विजयाने अनेकांना मोठा आनंद झाला. पण या विजयानंतर त्याने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

(bigg boss marathi 4 winner Akshay Kelkar shared emotional post after finale)

अक्षयने या खेळासाठी यासाठी प्रचंड मेहनत घेतली, खूप हुशारीने तो खेळला. त्याने कधी कुणाची मनं दुखावली नाहीत. तो कायम सगळ्यांशी जुळवून घेत राहीला. मात्र जे पटले नाही त्याला विरोधही केला. त्यामुळे अक्षयचा स्वभाव आणि खेळ पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना आवडला. त्याच्या खेळाच्या पद्धतीमुळेच त्याला सगळे मास्टर माइंड म्हणून लागले. अगदी बिग बॉसनेही 'शिकारी', 'जादूगर' अशा शब्दात अक्षयचे कौतुक केले होते. अखेर आपल्या शांत स्वभावाच्या आणि युक्तीच्या जोरावर त्याने ही जेतेपद मिळवले.

आता अक्षयने एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात तो म्हणतो, ''नमस्कार मित्रांनो.. सगळ्यात आधी तुम्ही मला जे "क.मा.ल" प्रेम देत आहात त्यासाठी खूप जास्त Thank You.. तुमच्या सगळ्या मेसेजेस ना reply देऊ शकलो नाही. आणि सगळ्या stories सुद्धा repost करू शकलो नाही. फोन कॉल अजूनही थांबत नाहीयेत आणि तुमचं हे इतकं जास्त प्रेम मला मिळालं त्यासाठी आता काय आणि कोणत्या शब्दात माझे ऋण व्यक्त करू खरंच समजत नाहीये. पण माझ्या संपूर्ण 100 दिवसांच्या प्रवासात जस मला समजून घेतलंत, तसं आताही समजून घ्याल याची मला खात्री आहे.''

''आजवर जे काम केलं त्यातून देशातील काही भागांपर्यंत आणि काही घरापर्यंत पोचत होतो, पण आपल्या घरातली कौतुकाची थाप ही बाहेरच्या माणसाच्या कौतुकापेक्षा जास्त हवीहवीशी वाटते. आणि म्हणूनच खरतर माझ्या घरातल्या, "महाराष्ट्रातल्या" आणि "मराठी" माणसांपर्यंत पोचण्यासाठी हा लढा लढलो आणि तुमची शाबासकी 'ती '(Trophy) च्या स्वरूपात पोचली!
कोणताच माणूस परिपूर्ण नसतो! मीही नाही!''

''काहीना मी नाही आवडलो. त्यांच्याही प्रतिक्रिया ते माझ्यापर्यंत पोचवत आहेत. अस म्हणतात की, आपण त्यांच्यावरच असे रागावतो ज्याला आपण आपला मानतो! आरोप प्रत्यारोपांच्या जाळ्यातून देव ही वाचू शकले नाहीत, मी तर साधा माणूस आहे! माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, तर मोठ्या मनाने मला माफ करा. तो एक खेळ होता. एक खेळ म्हणून च मी खेळला आणि त्या व्यतिरिक्त आणि त्या अधिक कधीच काही नव्हते.''

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

''आई म्हणते गोड पदार्थांचा गोडवा वाढवण्यासाठी त्यात चिमुटभर मीठ टाकतात... असेल...
माझ्या या गोड प्रवासात तुम्ही सुद्धा गरजेचे होतात. तुम्हालाही खूप धन्यवाद. आणि ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, तुमच्या साठी -I love You ! मी फक्त तुमचाच आहे''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT