bigg boss marathi fame actress megha dhade joins bjp in presence of Chandrashekhar Bawankule sakal
मनोरंजन

Megha Dhade: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री मेघा धाडेचा 'भाजप'मध्ये प्रवेश..

अभिनयानंतर आता राजकारणात एन्ट्री..

नीलेश अडसूळ

Megha Dhade: आपल्या बोल्ड लुक आणि बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मेघा धाडे. मेघाने आजवर अनेक मालिका, चित्रपट, रिएलिटी शो केले आहे. पण तिला खरी ओळख मिळाली ती 'बिग बॉस मराठी' मुळे.

ती बिग बॉस मराठीची विजेती राहिलेली आहे. एवढेच नाही तर बिग बॉस हिन्दीतही ती सहभागी झाली होती. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. याशिवाय अनेक विषयांवर ती आपलं मत मांडत असते.

अशा अभिनेत्री मेघा धाडेनं आता 'भाजप'मध्ये प्रवेश केला आहे. तिच्या या भाजप प्रवेशाची सध्या बरीच चर्चा आहे.

(bigg boss marathi fame actress megha dhade joins bjp in presence of Chandrashekhar Bawankule )

मेघाच्या पक्ष प्रवेशावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वतः उपस्थित होते. तसेच भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डेही उपस्थित होत्या. या सोशल मीडिया पेजने मेघाचा पक्ष प्रवेशाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तो सध्या बराच व्हायरल होत आहे.

गेल्यावर्षी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही भाजपात प्रवेश केला होता. त्या आधी प्रिया बेर्डे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. सध्या त्या भाजपच्या सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष पदी कार्यरत आहेत.

तर मेघा धाडे 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाची ती विजेतीआहे. 'बिग बॉस'मध्ये तिने आपली दमदार खेळी करत सर्वांनाच प्रभावित केले. मेघाचा रोखठोक स्वभाव आणि बुद्धीचातुर्य यामुळे ती बिग बॉस मध्ये पहिल्या दिवसापासून मेघा चर्चेत होती. मेघा सध्या मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी आजही तिचा तगडा चाहतावर्ग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

Mira-Bhayandar: तो हिंदी भाषिक व्यापारी नडला म्हणून मनसे कार्यकर्ता भिडला, 'त्या' व्हायरल व्हिडिओमागची स्टोरी काय?

SCROLL FOR NEXT