Bigg Boss Marathi Season 2 winner Shiv Thakare says Kangana Ranaut favourite actress but Shiv said he did not like controversial statements
Bigg Boss Marathi Season 2 winner Shiv Thakare says Kangana Ranaut favourite actress but Shiv said he did not like controversial statements  sakal
मनोरंजन

Exclusive : शिव ठाकरे म्हणतो; कंगना आवडती अभिनेत्री, पण आता…

सकाळ वृत्तसेवा

बिग बॉस मराठी सिजन २ चा विजेता शिव ठाकरे नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतो. शिवने ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंग, कंगना रनौतबद्दल आपलं मत मांडलंय. चाहत्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया दिवसही चांगला करतात. पण त्यांची नकारात्मक प्रतिक्रिया दिवस खराबही करू शकते, असं त्याने म्हटले असून कंगना आवडती अभिनेत्री होती. मात्र, हल्ली वादग्रस्त विधानांमुळे ती आवडत नसल्याचं शिवने सांगितले.

गुढीपाडव्यानिमित्त शिव ठाकरेने ‘सकाळ’शी इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे संवाद साधला. सोशल मीडियावरील ट्रोलिंगसंदर्भात प्रश्न विचारला असता, शिव म्हणतो, राग हा आपल्या माणसांवरच निघतो, त्यामुळे मी सोशल मिडीयावरच्या ट्रोलिंगकडे सकारात्मकतेने पाहतो. लोकांच्या एका कमेंटमुळे दिवस छान जातो. पण एखाद्या कमेंटमुळे दिवस खराबसुद्धा जातो. त्यामुळे लोकांनी विचार करून समोरच्याला ट्रोल करावं, असं शिव म्हणाला.

वाईट मनस्थितीतून जाणारे ट्रोल करतात. पण आपणही त्यांना समजून घेतले पाहिजे. मी लोकांच्या प्रतिक्रिया डिलीट करत नाहीत. शक्यतो उत्तर देणंही टाळतो. त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे त्रास होतो. अशा प्रतिक्रिया वाचल्यानंतर डोक्यात सतत तेच विचार घोंगावतात, असं शिवने सांगितले.

शिवने यावेळी आपल्या आवडीनिवडी सुद्धा सांगितल्या. शिव म्हणतो, इमरान हाश्मी हा आवडता अभिनेता आहे. आवडती अभिनेत्री कंगना होती परंतु तिच्या चुकीच्या विधानांमुळे आता ती आवडत नाही. गुलाबजामून हा आपला आवडता पदार्थ असून मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा आवर्जून गुलाबजामून खातो. तर ‘जो भी चाहु वो मै पाऊ’ हे आपलं आवडत गाणं असल्याचं सांगितलं.

बिग बॉस बद्दल बोलताना शिव म्हणाला, काही लोक नाती टिकवत नाहीत, पण आपण ठरवलं तर लोकांशी नाती टिकवून ठेवू शकतो. मी बिग बॉस मध्ये सगळ्यांशी चांगला होतो त्यामुळे मला तिथून खूप प्रेम मिळालं असल्याचं त्यानं सांगितलं. लोकांच्या मनात बिग बॉसनंतर मी घर बनवलं असून ते टिकवून ठेवणार आहे. आपल्या चाहत्यांबद्दल बोलताना शिवने मी त्यांचा कायम ऋणी असल्याचं सांगितलं. फॅन्स हे नेहमी नवीन ऊर्जा देतात असं त्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT