Bigg Boss OTT 2 Eviction Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2 Eviction: शॉकिंग डबल एविक्शन! बिग बॉसच्या घरातुन 'हे' दोन स्पर्धक जाणार बाहेर....

या आठवड्यात मनीषा राणी, जिया शंकर, अविनाश सचदेव आणि जैद हदीद नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता फायनल पुर्वीच घरातुन कोण बाहेर जाणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.

Vaishali Patil

Bigg Boss OTT 2 Eviction: बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सध्या अंतिम टप्यात आला आहे. काही दिवसातच या शोचा फिनाले होणार आहे. शोमध्ये या आठवड्यात चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.

त्यांच्यात मनीषा राणी, जिया शंकर, अविनाश सचदेव आणि जैद हदीद नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता फायनल पुर्वीच घरातुन कोण बाहेर जाणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.

त्यातच आता घरातुन बाहेर कोण जाणार याबाबत शॉकिंग खुलासा झाला आहे. या आठवड्यात घरातुन एक नव्हे तर दोन स्पर्धक घराबाहेर जाणार असल्याचं बोललं जात आहे.

लवकरच या शोला टॉप 5 स्पर्धक मिळणार आहेत. यात अभिषेक मल्हानने आधीच ग्रँड फिनालेमध्ये एंट्री केली. त्यामुळे आता उरलेल्या स्पर्धकांपैकी ते चार स्पर्धक कोण असतील हे या आठवड्यात कळणार आहे.

या आठवड्यात चार स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. मनीषा राणी, जिया शंकर, अविनाश सचदेव आणि जद हदीद यांना एलिमिनेशनसाठी नॉमिनेट आले आणि आता यातील दोन स्पर्धकांना घरातुन बाहेर जावे लागणार आहे.

'बिग बॉस ओटीटी सीझन 2' या रिअॅलिटी शोमध्ये डबल इव्हिक्शन होणार आहे असल्याचं बोललं जात असतांनाच आता या आठवड्यात अविनाश सचदेव आणि जैद हदीद यांना घराबाहेर जावे लागणार आहे. त्या दोघांनाही खुप कमी मत मिळाल्यामुळे त्याचा बिगबॉसचा प्रवास संपणार आहे.

'बिग बॉस ओटीटी सीझन 2' च्या फिनाले बद्दल बोलायचं झालं तर 14 ऑगस्ट 2023ला शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. रात्री 9 वाजल्यापासून फिनाले Jio सिनेमावर प्रसारित होईल.

तर विजेतेपदासाठी एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांच्यातच घरी टक्कर होणार असल्याचं बोललं जात आहे. कारण दोघांचीही फॅन फॉलोविंग खुप तगडी आहे.

मात्र दोघांची मैत्री खुप घट्ट असल्याने दोघांपैकी कोणीही जिंकलं तरी त्यांच्या चाहत्यांना आनंदच होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT