Bigg Boss OTT 2 Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2: 'तुझ्या पाया पडतो मला जाऊ दे', बिग बॉसच्या घरात बंद असलेला सायरसची सलमानला विनवणी..

Vaishali Patil

Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन रिलीज झाल्यापासूनच तो चर्चेत आहे. आता पर्यंत या घरातुन चार स्पर्धक बाहेर पडले आहेत. ज्यात पलक, पुनित, आलिया अन् आकांक्षा पुरी यांचा सामावेश आहे.

त्यातच आता या आठवड्याच्या शेवटी आणखी एका सदस्यांची घराबाहेर जाण्यासाठी वर्णी लागणार आहे. सलमान खान होस्ट असल्यामुळे शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आता यातच हा शो आणखी वाढणार आहे.

वीकेंड का वारमध्ये सलमानने स्पर्धकांना चांगलचं फटकारलं आहे. शो आणखी वाढणार हे ऐकल्यानंतर चाहते खुश झाले तर दुसरीकडे घरातील काही स्पर्धकांना हे आवडलेल नाही.

'बिग बॉस'च्या घरात राहणं काही सोप नाही. घरात नेहमी वाद होत असतात. काही दिवसांतच घरातील एका स्पर्धकांची प्रकृती बिघडली असुन त्याला हा शो मध्येच सोडून बाहेर पडायचं आहे.

हे घडलयं ते घरातील सदस्य सायरस भरुचा याच्या सोबत. त्याने थेट सलमान खानला 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर काढण्यात यावे अशी विनंती त्याने केली आहे. इतकच नाही तर तो त्यासाठी सलमानचे पाय पडण्यासाठीही तयार झाला आहे.

सायरस म्हणाला, “आरोग्य ही सर्वात मोठी गोष्ट आहे, मी फक्त 51 वर्षांचा आहे. मला बाहेर पडून सर्वकाही ठीक कराव लागणार आहे. डायट आणि सर्वच. ते इथं बसू शकत नाही, इथलं वातावरण खूप विषारी आहे. जर त्यांनी ऐकलं नाही तर तो संपावर जाईल किंवा राजीनामा असंही त्याने सांगतिलं.

सलमाननं त्याला सांगतिलं की बाहेर लोकांना त्याचा खेळ आवडत आहे मात्र तरीही सायरस ऐकायला तयार नव्हता. तो सलमानला सांगतो की, तो त्याची झोप पुर्ण करु शकत नाहीत. तो फक्त तीनच तास झोपत आहे. त्याचे वजनही कमी होत आहे.

त्याच्या शरीरावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे त्याने सलमानला त्याला घरातुन बाहेर काढण्यासाठी भिकही मागितली. मात्र सलमानने असं करता येणार नसल्याचं सायरसला सांगतिलं.

रिपोर्ट्सनुसार, या आठवड्यात फलक नाजची बहीण शफाक नाज शोमध्ये दिसणार आहे. ती सलमानसोबत स्टेज शेअर करेल आणि कुटुंबीयांशी बोलेल. त्याच वेळी, या आठवड्यात कोणाला शोमधून बाहेर काढले जाईल हे पाहणे मनोरंजक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: ऋतुराज गायकवाडचं द्विशतक थोडक्यात हुकलं, पण संघाला तारलं! श्रेयस, जैस्वालच्या अपयशाने फॅन्सचं डोकं फिरलं

Pune Ganeshotsav : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त; आठ हजार पोलिस तैनात

Early Signs of Colon Cancer: साधं दुखणं की आणखी काही? हार्वर्ड तज्ज्ञ सांगतात कोलन कॅन्सरची ८ सुरुवातीची चिन्हं

Malegaon Municipal Election : मालेगाव महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Latest Marathi News Updates : केडीएमसी प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस!

SCROLL FOR NEXT