Bigg Boss OTT 2 esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2 : 'बापावर जायचं नाही'! एल्विस-अविनाशमध्ये जुंपली

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. खेळ बाजूला राहतो आणि एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप ऐकावे लागतात.

युगंधर ताजणे

Bigg Boss OTT 2 : बिग बॉस ओटीटीनं गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मनोरंजन विश्वात या रियॅलिटी शो ने प्रेक्षकांना कित्येकदा कोड्यात टाकले आहे. बिग बॉस हा शो मुळी प्रतिक्रियांशी संबंधित आहे. सोशल मीडियावर त्यावरुन रंगणाऱ्या वादावर नेटकरी वेगवेगळे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन सध्या जोमात सुरु आहे. सुरुवातीच्या काळात बिग बॉसच्या घरातीला काही स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणं सुरु होती. मात्र सलमाननं सगळ्यांना एकदाच तंबी दिल्यानंतर वेगळेच चित्र दिसून आले आहे. पहिल्यांदा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीनची पत्नी आलिया सिद्धिकीनं आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुन तिला पुजा भट्टनं चांगलेच सुनावले होते.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

बिग बॉसचे घर आता हा भांडणाचा आखाडा होत चालल्याचे दिसून आले आहे.त्यातील सहभागी कलाकार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. अशात सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. खेळ बाजूला राहतो आणि एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप ऐकावे लागतात. ही मनोरंजनाची हिणकस पातळी आहे. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. सध्या वाईल्ड कार्डमधून इंट्री केलेल्या एल्विश यादव आणि अविनाश यांच्यात जोरदार भांडणं झाल्याचे दिसून आले आहे.

यासगळ्यात पुजानं यासगळ्यांना चांगलेच सुनावले आहे.आपण या शोमध्ये कशासाठी आलो आहोत याचे भान ठेवण्याची गरज असल्याचे तिनं म्हटले आहे. पुजानं जियाची खरडपट्टी काढली आहे. दुसरीकडे एल्विश आणि अविनाशची जोरदार भांडणं खूप काही सांगून जाणारी आहेत. त्यांच्यातील वाद एवढा वाढला की, एल्विशनं अविनाशला वडिलांवरुन काही शब्द वापरले. त्यानंतर अविनाशचा राग अनावर झाला. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

अभिषेकनं एल्विश आणि अविनाशला शांत करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे पुजानं जियाला बिग बॉसच्या घरात कसे वागायचे याचे धडे दिले आहे. जिया ही वातावरण बिघडवून टाकणारी आहे. असे पुजाचे म्हणणे होते. आपलं काम साधून घेण्यासाठी ती लहान मुलीसारखी वागते. या शब्दांत पुजानं तिची भूमिका मांडली आहे.

Bigg Boss OTT 2 Elviesh And Avinash Smashed Viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Year Ender 2025: हत्तींचं स्थलांतर, बिबट्यांची दहशत अन् कुत्र्यांचा वाद… 'हे' वर्ष वन्यजीवांसाठी इतकं हादरवणारं का ठरलं?

Kolhapur CPR : दोन हजारांत एमआरआय, ३५० रुपयांत सीटीस्कॅन; सीपीआरमधील सुविधेमुळे रुग्णांचा खर्च आणि वेळ वाचला

Year Ender 2025: लोकांनी वजन कमी करण्यापेक्षा हेल्दी राहण्यावर दिला भर; 'हे' ठरले 2025 चे 7 जबरदस्त फिटनेस ट्रेंड्स

Latest Marathi News Live Update: अॅडव्होकेट प्रशांत पाटील यांनी बारामती सत्र न्यायालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने लावली हजेरी

नागराजचं खरं रूप बापूमुळे अखेर अर्जुन सायली समोर येणार ? प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता याचाही खून.."

SCROLL FOR NEXT