bigg boss ott 2 falaq naaz and jad hadid evicted from bigg boss ott 2 salman khan SAKAL
मनोरंजन

Bigg Boss Ott 2: एकाच दिवशी दोघे घराबाहेर.. फलक नाज - जैद हदीदचा खेळ संपला, फॅन्स झाले खुश

Bigg Boss Ott 2 यंदा डबल Eviction झालंय

Devendra Jadhav

Falaq Naaz - Jad Hadid Evicted From Bigg Boss OTT 2 House: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती Bigg Boss Ott 2 ची. Bigg Boss Ott 2 सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. Bigg Boss Ott 2 यंदा डबल Eviction झालंय. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

फलक आणि जैद घराबाहेर

बिग बॉस OTT 2 मधील दोन स्पर्धक फलक नाझ आणि जैद हदीद यांना रिअॅलिटी शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. फलक आणि जैद व्यतिरिक्त..

आशिका भाटिया, अविनाश सचदेव, एल्विश यादव आणि जिया शंकर असे स्पर्धक या आठवड्यात एलिमिनेशनसाठी नॉमीनेट होते. यापैकी फलक आणि जैद यांना घराबाहेर जावं लागलंय

बिग बॉस पाहणारे फॅन्स झाले आनंदी

Bigg Boss Tak या लोकप्रिय ट्विटर हँडलने याविषयी माहिती दिली.. , "ब्रेकिंग! जैद हदीद आणि फलक नाज यांना बिग बॉसच्या ओटीटी घरातून बाहेर काढण्यात आले आहे. आनंद झाला असेल तर रिट्विट करा!" या बातमीवर प्रतिक्रिया देताना एका ट्विटर युजरने म्हटले, “शेवटी! #BiggBossOtt2 घरातील चांगली बातमी. आता कंटाळा येणार नाही.”

"मी खूप आनंदी आहे," असं एक चाहता म्हणाला. याशिवाय एका व्यक्तीने त्याला 'कर्मा' म्हटले. "कंटाळवाणे लोक निघून गेले..आता अभिषेक जिया आणि अविनाशसोबत खेळेल," असे ट्विट केलंय. "टीम एल्विश सर्व मार्गाने प्रामाणिकपणे आणि सचोटीने खेळ खेळत आहे. त्याला शेवटपर्यंत साथ देऊया!" अशा कमेंट करत चाहत्यांनी जैद आणि फलक गेले याचं समर्थन केलंय तर, एल्विशला साथ दिलीय

फलक घराबाहेर जाताना अविनाश भावुक

फलक नाजला हसत हसत घरातून बाहेर पडताना पाहून अविनाश सचदेव भावूक झाला. यादरम्यान तो फलक नाजचा हात धरून आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसला.

बिग बॉसच्या घरात दोघांची ही शेवटची भेट पाहून चाहतेही भावूक झाले आहेत. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरं तर अविनाश सचदेवने बिग बॉसच्या घरातच फलक नाझवर आपलं प्रेम व्यक्त केलंय. परंतु, फलकने मात्र तिच्या भविष्यातील नियोजनांमुळे त्याचे प्रेम नाकारले. पण दोघांच्या वाढत्या जवळीकीने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment : जिद्दीला सलाम! गवंडी काम करत धरणग्रस्त शब्बीर सय्यद यांची मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीत चमकदार झेप

Who is Krish Bhagat? ३ दिवसांपूर्वी रिप्लेसमेंट, आज Mumbai Indians कडून पदार्पण; आमदाराचा पुतण्या IPL 2026 गाजवण्यासाठी सज्ज

Maharashtra Police Transfers : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या एसपींची बदली, पोलिस प्रशासनात मोठे बदल

Nashik Crime : भोंदू खरातला पाचव्या गुन्ह्यात २३ पर्यंत कोठडी; बचावपक्षाचा जोरदार विरोध

Chakur Crime News: नवऱ्याच्या प्रेयसीला फसवण्यासाठी चुलतीकडून पुतण्याचा खून

SCROLL FOR NEXT