bigg boss ott 2 finale live updates winner elvish yadav abhishek malhan manisha rani pooja bhatt bebika dhurve drj96 SAKAL
मनोरंजन

BB OTT 2 Finale Live Updates: आणि एल्विश यादवने बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं

बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे

Devendra Jadhav

आणि एल्विश यादव बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता

अखेर 58 दिवसांपासून सुरू असलेला 'बिग बॉस ओटीटी 2' हा रिअॅलिटी शो अखेर संपुष्टात आला आहे. या सिझनला त्याचा विजेता मिळाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची प्रतीक्षाही आता संपली आहे. शोच्या या सीझनच्या विजेत्याचे नाव समोर आले आहे. एल्विश यादव बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता ठरला आहे.

एल्विश आणि अभिषेक मध्ये कोण जिंकणार?

बिग बॉस ओटीटी 2 मध्ये फायनलची लढत सुरू आहे. आता एल्विश आणि अभिषेकमध्ये चुरस रंगणार आहे. दोघे टॉप 2 आहेत. दोघांमध्ये कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आज.

एल्विश आणि अभिषेक मध्ये कोण जिंकणार? व्होटिंग लाईन सुरू

बिग बॉस ओटीटी 2 मध्ये मोठा ट्विस्ट आलाय. अभिषेक आणि एल्विश आता टॉप 2 उरले आहेत. आणि मनीषा राणी बिग बॉस ओटीटी 2 मधून बाहेर आलीय

जिया शंकर तुझी ड्रीम गर्ल आहे का? अभिषेकने स्पष्टच दिलं उत्तर

बिग बॉस ओटीटी 2 मध्ये ड्रीम गर्ल 2 ची स्टारकास्ट आयुष्यमान खुराना आणि अनन्या पांडे आले होते. अनन्या पांडेने जियाला विचारलं की तू अभिषेकला लाईक करतेस का? जिया हो म्हणाली. जेव्हा अनन्याने अभिषेकला जिया तुझी ड्रीम गर्ल 2 आहे का? हा प्रश्न विचारला तेव्हा अभिषेकने मात्र नकार दिला. तो म्हणाला, आम्ही चांगले मित्र आहोत. घराबाहेर सुद्धा मैत्री निभावायला आवडेल पण अजून काही नाही

बिग बॉस ott 2 मध्ये ड्रीम गर्ल 2 चं प्रमोशन

बिग बॉस ott 2 च्या फिनालेमध्ये ड्रीम गर्ल 2 चं प्रमोशन झालंय. आयुष्यमान खुराना आणि अनन्या पांडे यांची एन्ट्री झाली. या दोघांनी सलमान खान सोबत मजा मस्ती केली.

टॉप 4 मधून बेबीका धूर्वे बाहेर गेलीय

बिग बॉस ओटीटी 2 ची ग्रँड फिनाले सुरू आहे. या फिनालेमधून पूजा भट्ट सुरुवातीला बाहेर पडली. आता टॉप 4 मधून बाहेर बेबीका धूर्वे बाहेर गेलीय.

पूजा भट्ट बिग बॉस ओटीटी 2 मधुन बाहेर

पूजा भट्ट बिग बॉस ओटीटी 2 मधुन बाहेर. पूजा टॉप 5 मधुन बाहेर आलीय

पुजा आणि बेबिकाचा भन्नाट डान्स

घरात सतत एकमेकांशी वाद घालणाऱ्या बेबिका आणि पुजाचा भन्नाट डान्स बघायला मिळाला. बेबिका आणि पुजाच्या डान्सची जुगलबंदी पहायला मिळाली.

अभिषेक मल्हान अजुनही हॉस्पीटलमध्येच

तब्येतीच्या कारणास्तव अभिषेक मल्हानला हॉस्पीटलमध्ये दाखल करावं लागणार आहे. सलमान खानने खुलासा केला की तो हॉस्पीटलमध्ये आहे. पण तो थोड्याच वेळात शो जॉईन करणार आहे.

गेल्या 58 दिवसांपासून सुरू असलेला Bigg Boss OTT 2 हा रिअॅलिटी शो अखेर काही तासातच संपणार आहे. या 'बिग बॉस ओटीटी 2' चा ग्रँड फिनाले आज म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सुरु झालाय . फिनालेपूर्वीच बिग बॉस OTT 2 हा भारतातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी स्ट्रीमिंग शो झाला आहे, या शो मध्ये प्रेक्षकांनी अनेक ड्रामा, वाद आणि तगडी स्पर्धा देखील दिसली. आता बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT