bigg boss ott 2 jiya shankar buys luxury car after eviction ved movie SAKAL
मनोरंजन

Bigg Boss OTT 2 मधुन बाहेर आली अन् श्रीमंत झाली, जिया शंकरने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत ऐकुन थक्क व्हाल

जियाने Bigg Boss OTT 2 बाहेर आल्यावर स्वतःलाच एक आलिशान गाडी गिफ्ट केलीय

Devendra Jadhav

Bigg Boss OTT 2 Jiya Shankar News: 'बिग बॉस OTT 2' चा फिनाले अगदी काही तासांवर येऊन ठेपलाय. Bigg Boss OTT 2 च्या टॉप 5 च्या मधुन जिया शंकर घराबाहेर पडली आहे. पण बाहेर आल्यावर जियाने अशी गोष्ट केली की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. बिग बॉसच्या घराबाहेर येऊन आठवडाही झाला नसला तरी अभिनेत्रीने एक नवी आलिशान गाडी खरेदी केली आहे.

जियाने खरेदी केली BMW गाडी

जियाने गाडी खरेदी करण्याचा व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये जिया नारळ फोडत आनंदात दिसतेय तर तिची आई आरती करताना दिसत आहे.

'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये पहिल्या दिवसापासून जिया शंकर चर्चेत होती. कोणी तिला भटका आत्मा म्हटलं तर कोणी मूर्ख.. आता जिया शंकरने स्वतःला एक आलिशान कार गिफ्ट केली आहे. जियाने खरेदी केलेली कार ही BMW चं नवं मॉडेल आहे. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

गाडीची किंमत ऐकुन थक्क व्हाल

व्हायरल झालेल्या व्हिडीओत जिया आधी गाडीवरचा पांढरा पडदा बाजुला काढते. मग ती 'हर हर महादेव' म्हणत नारळ फोडते. त्यानंतर तिची आई फुलांनी सजवलेले आरतीचे ताट आणते आणि बोनटला हार घालून तिची आरती करते.

पूजेनंतर जियाने पेढे देत पापाराझींचे तोंड गोड केलं. कारची आलिशान BMW कारची किंमत 45 ते 50 लाख रुपये आहे असल्याचं समजतंय. जियाने खरेदी केलेलं मॉडेल BMW X1 आहे.

फॅन्सनी केलं जियाचं कौतुक

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते जियाचं कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही स्वतःच्या कमाईने कार खरेदी केली, ही अभिमानाची बाब आहे. यासाठी तुम्हाला कोणाचीही गरज नाही. तू खरोखरच स्टार आहेस.

एका यूजरने लिहिले की, 'तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिला कोणत्याही पुरुषाची गरज नाही.' एकाने लिहिले, 'आत्मनिर्भर आणि एक अशी मुलगी जी स्वत:च्या बळावर इथपर्यंत पोहोचली. खूप अभिमान." एकुणच स्वतःच्या खेळाने बिग बॉस गाजवल्यावर जिया आता पुढे कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT