Bigg Boss OTT 2 Nomination: 
मनोरंजन

Bigg Boss OTT 2 Nomination: महाराष्ट्राहून जास्त भयंकर बिग बॉसचं राजकारण! अर्ध घर झालं नॉमिनेट, तर जिया अन् मनिषात तुफान राडा

Vaishali Patil

Bigg Boss OTT 2 Nomination: बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन हा यावेळी प्रेक्षकांनाही समजत नसल्याच चित्र सध्या दिसत आहे. बिग बॉस हा लोकप्रिय शो सलमान खान होस्ट करतो. तर ओटीटीचा सिझनही यंदा भाईजानच करत आहे.

त्यातच नुकतच घरात वीकेंड का वार झाला. या आठवड्यात आकांक्षाला घराबाहेर जावं लागलं. अशा प्रकारे आता घरातुन चार नॉमिनेशन पार पडले.

त्यात पुनीत सुपरस्टार, पलक, आलिया आणि आता आकांक्षा पुरी यांचा सामावेश आहे तर आता घरात या आठवड्यात नॉमिनेशन टाक्सही पुर्ण झालं आहे. त्यामुळे आता आकांक्षानंतर कुणाचा नंबर लागेल याकडे सर्वांच लक्ष आहे.

दरम्यान या आठवड्यात घरातुन कोण नॉमिनेट झालं हे पाहूया. यावेळी बिगबॉसने नॉमिनेशन टास्कमध्ये ट्विस्ट आणला होता.

नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सदस्यांना ज्याला नॉमिनेट करायचं आहे त्याच्या चेहऱ्यावर नकाराची खूण करत आहे.

त्यातच फुक्रा इन्सान म्हणजेच अभिषेक मल्हान हा कॅप्टन असल्यामुळे त्याला नॉमिनेट करण्यात येणार नाही हे देखील बिगबॉसने सांगितले होते.

या नॉमिनेशन टास्कमध्ये स्वत: बिग बॉसने जैद हदीदला शिक्षा म्हणून नॉमिनेट केले होते. तर पूजा भट्टने तिचा मित्र सायरस आणि मनीषा राणी यांना नॉमिनेट केले.

जैदने पूजा भट्ट आणि बेबीकाला तर जियाने मनीषा राणी आणि अविनाश सचदेव यांना आणि फलक नाझने जिया आणि सायरस यांना नॉमिनेट केलं होते.

अभिषेक मल्हान आणि पूजा भट्ट सोडून सगळे नॉमिनेट झाले मात्र ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा जिया शंकर नवीन कॅप्टन बनली.

त्यानंतर तिने गेम पलटला आणि पूजा भट्टला नॉमिनेट केले. आता यापैकी कोणते नामांकित स्पर्धक शोमधून बाहेर पडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मनीषाने जियाला नॉमिनेट केलं मात्र ती असं काही करेल असं जियाला वाटलं नव्हत. तसं झाल्याने जियाचा पार चढला आणि ती मनिषावर चिडली. यादरम्यान जियाने मनीषाला चाटूकार म्हटलं.

तर दुसरीकडे बेबिका आणि अभिषेक यांच्यात मैत्रीही झाली. त्यात जियाने अभिषेकच्या कॅप्टनसीवरही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे आता घरात कोण कोणाचा मित्र आहे आणि कोण कोणाविरुद्ध कधी काय षडयंत्र करेल हे काही सांगता येत नाही.

त्यातच आता या आठवड्यात घरातुन बाहेर जाण्यासाठी कोणाचा नंबर लागतो हे पाहणेही तितकेच उत्सुकतेचे ठरेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT