Bigg Boss OTT 2 Pooja Bhatt  esakal
मनोरंजन

Pooja Bhatt Bigg Boss OTT 2 : 'इगो' हर्ट झाला, विषय संपला! पूजाचा संताप...

पूजा ही बॉलीवूडमधील मोठी सेलिब्रेटी आहे. तिच्या नावाची वेगळी क्रेझ आहे.

युगंधर ताजणे

Bigg Boss OTT 2 : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सध्या बिग बॉस ओटीटीची जोरदार क्रेझ आहे. बिग बॉस ओटीटीचे दुसरे पर्व सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून बिग बॉसला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. खासकरुन तरुणाई या शो ला फॉलो करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. आताच्या बिग बॉस ओटीटीची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे.

पूजा भट्ट बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाली होती खरी. पण काही कारणास्तव ती बाहेर गेली. त्यानंतर पुन्हा त्यात एका निमंत्रणामुळे ती आल्यानंतर तिनं काही जणांवर आगपाखड केली आहे. पूजा ही बॉलीवूडमधील मोठी सेलिब्रेटी आहे. तिच्या नावाची वेगळी क्रेझ आहे. अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शक म्हणून तिनं तिची ओळख तयार केली आहे. अशातच बिग बॉस ओटीटीमधील तो प्रसंग समोर आला आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

यापूर्वी देखील पूजानं काही स्पर्धकांवर आगपाखड केली होती. पूजाशी कुणी उंची आवाजात बोलणं, तिला प्रतिप्रश्न विचारणे आणि तिच्याशी वाद घालणे हे अनेकांना महागात पडले आहे. ज्यावेळी बिग बॉस ओटीटी सुरु झाला त्यानंतर काही दिवसांत आपला दरारा तयार केला होता. तिनं नवाझुद्दीनच्या पत्नीला आलियाला चांगलेच खडसावले होते. आलिया सातत्यानं तिच्या आणि नवाझुद्दीनच्या वैयक्तिक आरोपांविषयी सहकाऱ्यांना सांगत होती.

यावेळी पूजानं आलिया खडसावले होते. तुझ्या कौटूंबिक भांडणाचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करु नकोस. याठिकाणी असणाऱ्या सहकाऱ्यांना खोटी सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करु नको. अशा शब्दांत पूजानं तिची नाराजी व्यक्त केली होती. आताही तिनं काही स्पर्धकांना फेक म्हणून घोषिक केलं आहे. पूजानं बिग बॉसच्या घरातील नाती ही अनेकदा खोटी असतात. त्याला वेगळ्या कारणासाठीच उपयोग होतो. असे म्हटले आहे. तिच्या त्या व्हायरल झालेल्या पोस्टची जोरदार चर्चा आहे.

बिग बॉसच्या घरातील प्रत्येकजण आणि त्या प्रत्येकाची नाती ही खोटी असल्याचे म्हटले आहे. व्हायरल झालेल्या त्या क्लिप्समध्ये पूजानं अविनाश सचदेव, बेबिका धुर्वे आणि जाद हदीद यांच्याविषयी भाष्य केले आहे. या घरामध्ये प्रत्येकानं दुसऱ्याला कसं अपमानित करता येईल याचाच विचार केला आहे. त्यामुळे कुणाविषयी चांगले आणि आदरानं बोलावं असा प्रश्न आहे.

मला माहिती आहे तुम्हा लोकांची भांडणं ही खोटी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्यातील मैत्री देखील खोटी आहे. तुमच्यातील प्रेम खोटे आहे. तुम्ही देखावा करत आहात. प्रेक्षकांना फसवत आहात. असे करु नका. मी इथं कुणाला पापी म्हणत नाही. पण त्यांना मुर्ख जरुर म्हणेल. असेही पूजानं यावेळई म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT