Bigg Boss Ott 2 Aashika Bhatia Evicted  Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2 : एल्विश, जिया, मनिषा की कुणी दुसरंच! घरातुन बाहेर जाणार कोण? नावं आलं समोर...

Vaishali Patil

Bigg Boss Ott 2 Update: 'बिग बॉस OTT 2' च्या फिनालेला काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यापुर्वी आता घरातुन बाहेर कोण जाणार यावर चर्चा सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी पूजा भट्ट घरातुन बाहेर जाणार अशी चर्चा रंगली होती. वैद्यकिय कारणाने तिला बाहेर जावे लागणार असा दावा केला गेला होता.

मात्र ती अजूनही शो मध्ये दिसत आहे. या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये पूजा भट्टला बिग बॉसनं काही अधिकार दिले होते. नॉमिनेशनमध्ये मनीषा राणी आणि आशिका भाटिया यांचे नाव होते.

आता सोशल मिडियावर आत घरातुन बाहेर जाणाऱ्या स्पर्धकाचे नाव समोर आलं आहे. फायनलपुर्वीच घरातुन अभिनेत्री आशिका भाटिया बाहेर झाली आहे.

शनिवारी वीकेंड का वार मध्ये सलमान खाने एल्विश यादव, मनीषा राणी, अभिषेक मल्हान यांचा क्लास घेतला. तर आज आशिकाला बाहेर जावे लागणार अशी चर्चा आहे.

Aashika Bhatia Evicted

वाईल्ड कार्ड एंट्री करणारी आशिका ही अवघ्या 2 ते 3 आठवड्यांतच घरातून बेघर झाली आहे. बिग बॉस खबरीच्या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की कमी मतांमुळे आशिकाला बाहेर जावे लागणार आहे.

आशिका भाटियाच्या करियरबद्दल बोलायचं झालं तर तिने 'मीरा' या शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तिने सोनी टीव्ही शो 'परवरिश' मध्ये महत्वाची भूमिका साकारली. त्याचबरोबर ती सलमानसोबत 'प्रेम रतन धन पायो'मध्ये त्याच्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेतही दिसली होती.

तर या आठवड्याच्या विकेंड का वार मध्ये सलमान एल्विशवर खुप भडकला होता. त्याने 'तिकीट टू फिनाले' टास्कनंतर खुप गैरवर्तन केले. त्याने खुप शिव्या दिल्या होत्या. शनिवारी वीकेंड का वारमध्ये सलमान खानने त्याला खुप झापलं. जेव्हा ऐल्विश आणि बेबिकाचं भांडण झालं तेव्हा त्याने तिच्याबद्दल खुप वाईट कमेंट केल्या होत्या.

त्या इतक्या वाईट होत्या कि बिग बॉसच्या निर्मात्यांना त्या म्यूट कराव्या लागल्या. सलमानने रागवल्यानंतर एल्विशने माफी मागितली. मात्र सोशल मिडियावर सलमान खुप ट्रोल होत आहे. आता रविवारी सलमान पुन्हा कोणाचा क्लास घेतो आणि टिकीट टू फिनाले कोणाला देणार की नाही, घरातुन बाहेर कोण जाणार हे पहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : समीर रिझवीचा तांडव! शतक हुकले, दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबईची हार, Point Table मध्ये मोठी उलथापालथ

पार्क केलेली थार अचानक रिव्हर्स आली, महिलेचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL

धक्कादायक! जत्रेतील आकाशपाळणा कोसळून मोठी दुर्घटना, ४० जण जखमी, Video Viral

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT