Elvish Yadav 
मनोरंजन

Elvish Yadav: एल्विश यादवनं चाहत्याच्या कानाखाली काढला जाळ; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हणतो, 'मी असाच आहे..'

Elvish Yadav: एल्विशचा जयपूर येथील एका रेस्टॉरंटमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका व्यक्तीच्या कानशिलात लगावताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Elvish Yadav: युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी-2 (Bigg Boss OTT-2) या कार्यक्रमाचा विजेता एल्विश यादवचा (Elvish Yadav) चाहता वर्ग मोठा आहे. 26 वर्षाच्या एल्विश यादवला बिग बॉस या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. एल्विश हे गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांमुळे चर्चे आहे. रेव्ह पार्टी प्रकरणामुळे एल्विश चर्चेत होता. आता एल्विश त्याच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. एल्विशचा जयपूर येथील एका रेस्टॉरंटमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका व्यक्तीच्या कानशिलात लगावताना दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

जयपूरमधील एका रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली आहे. या रेस्टॉरंटमध्ये एल्विश हा जात असताना एका माणसाला पाहून तो थांबला नंतर त्या माणसाला एल्विशनं कानशिलात लगावली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेचे कारण समजण्यासाठी पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. एल्विश यादव यांच्या पीआर टीमने या घडामोडीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण एल्विशनं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

पाहा व्हिडीओ:

एल्विशनं दिलं स्पष्टीकरण

एल्विशनं जयपुरमधील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला, "हे बघ भावा, मुद्दा असा आहे की, मला भांडण्याची आवड नाहीये, ना मला काही झाली की हात वर करण्याचा शौक आहे. मी नॉर्मल वागतो.ज्याला माझ्यासोबत फोटो काढायचा आहेत, त्याच्यासोबत मी फोटो काढतो. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, पोलीस आणि कमांडो देखील आहेत. मला आई किंवा बहिणीवरुन कोणी शिवीगाळ केली तर मी सोडणार नाही. त्याने मला शिवी दिली आणि मी जाऊन त्याला मारले. तो शिवीगाळ करू लागला तेव्हा मी त्याला मारलं. ही माझी स्वतःची स्टाईल आहे. मी असाच आहे. तो तोंडाने बोलतो पण भाऊ आपण तोंडाने बोलू शकत नाही."

कोण आहे एल्विश यादव?

एल्विश हा युट्यूबवर त्याचे विविध व्लॉग शेअर करत असतो. त्यानं बिग बॉस ओटीटी-2 मध्ये वाईल्ड एन्ट्री केली होती. एल्विशचा बिग बॉसच्या घरातील गेम प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे एल्विश बिग बॉस ओटीटी-2 या कार्यक्रमाचा विजेता ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT