मनोरंजन

Bigg Boss OTT: शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ मेसेज पाहून शमिताला कोसळलं रडू

बिग बॉस ओटीटीमध्ये रक्षाबंधन साजरा करण्यात आला.

प्रियांका कुलकर्णी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (shilpa shetty) पती राज कुंद्राच्या (raj kundra) अटकेनंतर सोशल मीडियापूसन दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी 'सुपर डान्स चॅप्टर-4' या शोमध्ये जवळपास महिनाभराने तिने पुन्हा एन्ट्री घेतली आहे. शिल्पाची बहीण अभिनेत्री शमिता शेट्टीने (shamita shetty) बिग बॉस ओटीटीमध्ये (Bigg Boss OTT) स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. नुकताच बिग बॉस ओटीटीमध्ये रक्षाबंधन साजरा करण्यात आले. यानिमित्ताने बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धकांच्या बहीण भावांनी व्हीडिओद्वारे त्यांच्यासाठी खास संदेश पाठवला होता. शमिताची बहीण शिल्पाने देखील यावेळी तिच्यासाठी व्हीडिओ पाठवला. यावेळी शिल्पाचे बोलणे ऐकून शमिता भावूक झाली.

शिल्पाने या व्हीडिओद्वारे शमिताला सांगितले, 'बिग बॉस असो वा बिग ब्रदर आपल्या आयुष्यात ते नेहमी येतातच. माहित नाही आपलं बिग बॉससोबत काय नातं आहे. तुला माहित आहे की, वेळ पडली तर आपण स्वत:च एकमेकींसाठी भाऊ होतो. माझ्या भावा, स्वत:ची काळजी घे. खंबीर राहा. कारण जर तू खंबीर राहिली तर मी आणि आई देखील स्ट्राँग राहू. आम्हा सर्वांना तुझी आठवण येते. असंच खेळत राहा.' शिल्पाचा हा व्हीडिओ पाहून शमिता भावूक झाली.

शमिताने सांगितले बिग बॉसमध्ये सहभागी होण्याचे कारण

बिग बॉस ओटीटीची पहिली स्पर्धक म्हणून एन्ट्री करताना शमिता म्हणाली होती, 'वेळ चांगली किंवा वाईट कशी ही असो, आपण श्वास घेणं तर सोडत नाही. तसंच आपण कामसुद्ध करत राहिलं पहिजे. बिग बॉस शोची ऑफर मला खूप आधी आली होती आणि मी त्यांना कमिटमेंट दिली होती. मी एकदा कमिटमेंट दिली की मागचापुढचा फारसा विचार करत नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

SCROLL FOR NEXT