deolina bhattachrya
deolina bhattachrya 
मनोरंजन

'एकीला कानफटात लगावण्याची, दुसऱ्याला चप्पल मारण्याची धमकी'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये (tv entertainment) पर्यत सर्वाधिक लोकप्रिय झालेला शो म्हणून बिग बॉसचे (bigg boss season 15) नाव घेता येईल. या मालिकेनं मोठया प्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सतत वाद, भांडण आणि आरोप प्रत्यारोप यामुळे या शोनं आपला दबदबा टिकवून ठेवला आहे. इतर मालिकांच्या तुलनेत बिग बॉसला मिळणारा प्रतिसाद कित्येक पटीनं मोठा असल्याचे दिसून आले आहे. सध्या हिंदी बिग बॉस चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यातील एक स्पर्धक इतर स्पर्धकांवर कमालीची भडकली आहे. तिनं एकीला कानफटात लगावण्याची तर दुसऱ्याला चप्पल मारण्याची धमकी दिली आहे.

आता थोड्याच दिवसांनी बिग बॉस 15 चा सीझन संपणार आहे. एक महिन्यानंतर या शो चा अंतिम सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये जोरदार वादाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा रियॅलिटी शो चाहत्यांच्या चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसेच आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी अभिजीत बिचुकलेनं (abhijeet bichukule) देवोलिनाला (deolina bhattachrya) किस करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर संतापलेल्या देवोलिनानं अभिजितला खडे बोल सुनावले होते. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. आताही देवोलिना रश्मी देसाई आणि अभिजितवर कमालीची भडकली आहे. तिनं त्यांना चांगलचं धारेवर धरलं आहे.

सोशल मीडियावर बिग बॉसच्या 15 व्या सीझनमधील एका एपिसोडचा प्रोमो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये देवोलिनानं त्या दोघांना मारण्याची धमकी दिली आहे. त्याचं झालं असं की, घरातील सर्व स्पर्धकांना असे सांगण्यात आले होतं, त्यांनी या आठवड्यामध्ये जेलमध्ये जाणाऱ्या स्पर्धकाचे नाव जाहीर करावे. त्यावेळी प्रत्येकजण देवोलिनाचे नाव घेताना दिसतो. अभिजितनं देखील देवोलिनाचे नाव घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी चिडलेल्या देवोलिनानं रश्मिला कानफटात लगावण्याची तर अभिजितला चप्पल मारण्याची धमकी दिली आहे. ती मैत्री करण्याच्या पात्रतेची नाही. अशी प्रतिक्रिया अभिजितनं (abhijeet bichukule) देवोलिनाच्या बाबत दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT