shamita shetty and tejaswi prakash 
मनोरंजन

Bigg Boss 15: आंटी म्हटलीच कशी? बिग बॉसच्या घरात धिंगाणा

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये(Tv Entertainment news) चाहत्यांची नेहमीच पहिली पसंती बिग बॉसला (Bigg Boss Season 15) राहिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Season 15: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये(Tv Entertainment news) चाहत्यांची नेहमीच पहिली पसंती बिग बॉसला (Bigg Boss Season 15) राहिली आहे. या रियॅलिटी शो चा आता 15 वा सीझन सुरु आहे. तो अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र त्याच्यावरुन पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे. अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukle) आणि सलमानच्या (Salman Khan) वादानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी तेजस्वी प्रकाशमध्ये तु तु मैं मै झाली आहे. त्यांच्यातील ही वादावादी सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्यानं नेटकऱ्यांचे मोठे मनोरंजन झाले आहे.

शमिता (Shamita Shetty) आणि तेजस्वीच्या (Tejaswi Prakash) भांडणाचे कारणही मोठे मजेशीर आहे. बिग बॉसनं सगभागी सर्व स्पर्धकांना एक टास्क दिला होता. त्या दरम्यान तेजस्वी आणि शमिता यांच्यात वादाला सुरुवात झाली. त्याचे रुपांतर भांडणात झाले. त्यावेळी तेजस्वीनं रागाच्या भरात शमिताला आंटी अशी हाक मारली. तो राग शमिताला काही सहन झाला नाही. आणि वाद सुरुच राहिला. सध्या सोशल मीडियावरुन त्याच्या काही क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. नेटकऱ्यांनी त्या दोघींना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसांपासून बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या अभिजित बिचुकलेनं सलमानवर आगपाखड केली होती.

आता बिग बॉसमध्ये एक्स विजेता आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची एंट्री होणार आहे. मेकर्सनं या एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. दीपिका त्या शो मध्ये काय करते आहे असा प्रश्न यावेळी नेटकऱ्यांनी विचारला आहे. त्यावर ती तिच्या आगामी गहराईया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आल्याचे दिसून आले आहे. यावेळी बिग बॉसचा होस्ट सलमान खान यंदाच्या सीझनचा ग्रँड फिनाले कधी होणार हे सांगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT