Bipasha Basu  esakal
मनोरंजन

Bipasha Basu: आलियानंतर बिपाशा म्हणतेय, ‘ बेबी ऑन द वे’! लवकरच देणार गोड बातमी...

सकाळ डिजिटल टीम

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी नुकतचं एका परीचं स्वागत केलय. त्याच्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र आलिया रणबीरचं नव्हे तर बॉलीवूडचं आणखी एक  जोडपं आहे जे लवकरच आई बाबा होणार आहेत. ते जोडपं आहे बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर. हे दोघेही त्यांच्या या प्रवासाचा आनंद घेत आहेत. इतकच नाही तर ते वेळोवेळी  सोशल मीडियावर  येणाऱ्या बाळासंदर्भात प्रत्येक अपडेट त्यांच्या चाहत्यांशी शेअर करताय.

 त्याच्या हॉस्पिटमध्ये तपासणीसाठी गेल्यापासून तर नर्सरीच्या तयारीपर्यंत, बिपाशा तिच्या इंस्टाग्राम हँडलवर सगळेच फोटो शेअर करत असते. तिन नूकतचं केलेलं बोल्ड फोटोशूट चांगलच ट्रोल झालेलं असतांनाच तिने आज 'बेबी ऑन द वे' अशी घोषणा करत करणसोबत तिच्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला.

हेही वाचा: का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

 बिपाशा बसूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, तिने एका काळ्या रंगाचा शर्ट ड्रेस घातलेला आहे. तिने केस मोकळे केस सोडत आणि लाइट मेकअप केलाय. ती एका इग्लिश गाण्यावर ताल धरत नाचत आहे. ती तिच्या बेबी बंपवर हात ठेवुन काळजीपूर्वक नाचत आहे. प्रेगन्सी ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत करणही नाचतांना दिसतोय. व्हिडिओवर तिने 'बेबी ऑन वे' असं लिहिलंय.

मात्र, काहींना बिपाशाचं असं नाचणं मुळीच आवडलेलं दिसत नाहिये. यूजर्सने तिला या अशा स्थितीत डान्स करण्यास न करण्याचा सल्ला दिलाय. एका यूजरने तर लिहिलंय की, 'वेडी झालीस आहेस का, या अवस्थेत नाचतेय, स्वत:ची नाही तर त्या बाळाची तर काळजी घे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT