Bipasha Basu : बेबी बंपमुळे बिपाशा बसू झाली ट्रोल; संतापून म्हणाली, ते आमच्या बाळाचे घर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bipasha Basu Trolled News

बेबी बंपमुळे बिपाशा बसू झाली ट्रोल; संतापून म्हणाली, ते आमच्या बाळाचे घर...

Bipasha Basu Trolled News आपल्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनयाने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री बिपाशा बसूने काही आठवड्यांपूर्वीच गरोदरपणाची घोषणा केली होती. तिने तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना फोटोशूटही केला होता. फोटोशूटमध्ये बिपाशा (Bipasha Basu) सिंगल शर्ट घातलेली दिसली होती. त्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. आता ट्रोलर्सवर निशाणा साधताना बिपाशाने सडेतोड उत्तर दिले आहे.

बिपाशा बसू (Bipasha Basu) गर्भवती असल्याची बातमी ऐकून काहीजण खूप खूश आहेत, तर काहीजण तिच्या ड्रेसिंग सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. हे सर्व ऐकून बिपाशाने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे. ‘यामध्ये काय चूक आहे. का शेअर करू नाही. आम्ही दोघांचे तीन होणार आहोत. ही आनंदाची बातमी ऐकून आम्ही सर्वजण उत्सुक आहोत, अशी बिपाशा बसू म्हणाली.

हेही वाचा: दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी व निर्माता रविंदर चंद्रसेकर विवाहबद्ध

‘आम्हाला मॅटर्निटी फोटोशूट (Baby Bump) करायचे होते आणि मला बेबी बंप दाखवायचा होता. जेव्हा जेव्हा मी एखाद्या महिलेचा बेबी बंप पाहतो तेव्हा मला आनंद होतो. त्यामुळेच आम्ही हे शूट पूर्ण केले. मला यात काही चुकीचे दिसत नाही. सध्या ते आमच्या बाळाचे घर आहे. या दरम्यान माझ्या शरीरात अनेक बदल होत आहेत’ असेही बिपाशा बसू म्हणाली.

‘आमच्या आयुष्यात एक आनंद आला आहे जो आम्हाला आमच्या प्रियजनांसोबत शेअर करायचा होता. ज्यांना आम्ही आवडतो त्यांना ही बातमी सांगू इच्छितो. त्यामुळेच आम्ही हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आम्ही हे ट्रेंड आहे म्हणून नाही केल तर ते आयुष्यातील सर्वात मोठे सुख आहे म्हणून केले. हा क्षण पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे त्याचा आनंद घेत आहे’ असेही बिपाशा बसू म्हणाली.

Web Title: Bipasha Basu Actress Trolled Baby Bump

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..