bipisha basu: सध्या बॉलीवूडमध्ये डिलिव्हरीचे वातावरण निर्माण झाले आहे, काजल अग्रवाल, सोनम कपूर यांच्या डिलिव्हरी नंतर आता आलिया भट्ट आणि बिपाशा बासू यांच्या डिलिव्हरीची वेळ जवळ येत आहे. जसे जसे डिलिव्हरीची वेळ जवळ येते तेंव्हा वेध लागते तेमॅटरनिटी फोटो शुटचे. बिपाशा बासुने देखील असेच मॅटरनिटी फोटो शुट केले आहे, पण तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
(Bipasha Basu shares new pic from maternity photoshoot, says 'Love the body you live in' netizens trolled her )
बिपाशा बासू आणि करणं सिंग ग्रोहर २०१६ मध्ये लग्न बंधनात अडकले. आणि आता हे दोघे लवकरच आई-बाबा होणार आहे. हल्ली प्री-वेंडिग प्रमाणे डिलिव्हरीच्या आधी मॅटरनिटी फोटो शुट करण्याची क्रेझ आहे. बिपाशा ने देखील मॅटरनिटी फोटो शुट केले आहे.बिपाशा ने गोल्डन शिमरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. आणि तिचा बेबी बंप मस्त दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे तेज खुलून आले आहे. पण बिपाशाच्या या शुटला ट्रोल केले जात आहे.
एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, "हे फिल्मी कलाकार मॅटरनिटी फोटो शुटच्या नावाने अंगप्रदर्शन करतात" तर दुसऱ्याने लिहिले आहे की, "अरे तुमच्या प्रसिद्धी साठी होणाऱ्या बाळाला तरी सोडा". तर एक म्हणतो, "बॉलीवूडवाले पैशासाठी काय पण करतील, हे लोक मुलं जन्माला घालतात ते पण प्रसिद्धीसाठीच" तर काही युजर्स ने बिपाशाचे कौतुक केले आणि तिला शुभेच्छाही दिल्या आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.