Bipasha slams Tejasswi for calling Shamita shetty aunty  
मनोरंजन

Bigg Boss 15: 'आधी तुझ्या बॉयफ्रेंडला सांभाळ'; तेजस्वीवर बिपाशा भडकली

शमिता शेट्टीला आंटी म्हटल्याने बिग बॉसच्या घरात वाद

स्वाती वेमूल

Bigg Boss 15: 'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. सध्या बिग बॉसचा पंधरावा सिझन अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र या घरातील स्पर्धकांची भांडणं दररोज नव्या रुपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. गेले काही दिवस अभिजीत बिचुकले आणि सलमान खान यांच्यातील वादानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर आता शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि तेजस्वी प्रकाशमध्ये (Tejasswi Prakash) 'तू तू मैं मै' झाली आहे. या वादादरम्यान तेजस्वी ही शमिताला आंटी म्हणाली. यावरून आता बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने तेजस्वीवर टीका केली आहे. तेजस्वीने आधी तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबतचे प्रश्न सोडवावेत आणि मग इतरांवर निशाणा साधावा, असं बिपाशा तिला म्हणाली. (Bipasha slams Tejasswi for calling Shamita shetty aunty)

बिपाशाने ट्विट करत याबद्दलची नाराजी व्यक्त केली. 'आधी वयावरून वाईट टिप्पणी करायची आणि नंतर माफी मागायची. हे कीव येण्यापलीकडचं आहे. ही मुलगी विजेती ठरेल असं कोणाला वाटत असेल किंवा ती कोणाची आदर्श असेल तर खरंच वाईट परिस्थिती आहे. जर तुला असुरक्षित वाटत असेल, तर इतरांवर खालच्या स्तराची टीका करण्याआधी तुझ्या बॉयफ्रेंडसोबतचे प्रश्न सोडव, जो तुझ्या मनात अशी भावना आणतोय', अशा शब्दांत बिपाशाने तेजस्वीला सुनावलं.

शमिता आणि तेजस्वीच्या भांडणाचे कारणही मोठे मजेशीर आहे. बिग बॉसनं सर्व स्पर्धकांना एक टास्क दिला होता. त्या दरम्यान तेजस्वी आणि शमिता यांच्यात वादाला सुरुवात झाली. त्याचं रुपांतर भांडणात झालं. त्यावेळी तेजस्वीनं रागाच्या भरात शमिताला आंटी अशी हाक मारली. ते शमिताला सहन झालं नाही आणि वाद सुरुच राहिला. सध्या सोशल मीडियावर त्याच्या काही क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan on PM Modi : देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

Shahada Bribery Case: वनपाल संजय पवार यांना न्यायालयीन कोठडी; सव्वादोन महिन्यांनंतर ‘एसीबी’ची दुसरी कारवाई

जमलं तर थोडीशी जमीन घ्या... स्वतःच्या जमिनीवर डाळ तांदूळ पिकवून खातेय लोकप्रिय अभिनेत्री; म्हणते- इतका फरक...

प्रभासला नेमकं झालंय तरी काय? ऑर्थोपेडिक सर्जनच्या पोस्टने वेधलं फॅन्सचं लक्ष, फॅन्स म्हणाले- ‘अन्ना, तुम्ही ठीक आहात ना?’ POST VIRAL

Marathi News Live Updates : राहुल गांधींचा पोलीस ठाण्यात ठिय्या; जंतर-मंतर आंदोलनातील जखमी विद्यार्थ्याच्या तक्रारीवर एफआयआरची मागणी

SCROLL FOR NEXT