

Ruturaj Gaikwad on MS Dhoni | CSK
Sakal
CSK Captain Ruturaj Gaikwad Reacts to MS Dhoni's IPL Retirement: एमएस धोनी आयपीएलमधून निवृत्त कधी होणार? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जात होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सने याबाबत महत्त्वाची घोषणा आज (१७ नोव्हेंबर) केली आहे.
धोनी आता आयपीएलमधून खेळाडू म्हणून निवृत्त झाला आहे. मात्र असे असले तरी त्याचे धोनी चेन्नई सुपर किंग्ससोबतचे नाते संपलेले नाही. याबाबत चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनेही भावनिक पोस्ट केली आहे.