jaya prada Sakal
मनोरंजन

Jaya Prada Birthday: जया प्रदा लग्न करूनही राहतात एकट्या, कारण माहितीये का?

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री जया प्रदा यांनी भलेही राजकारणात प्रवेश केला असेल, पण एक वेळ अशी होती जेव्हा त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आल्या होत्या.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री जया प्रदा यांनी भलेही राजकारणात प्रवेश केला असेल, पण एक वेळ अशी होती जेव्हा त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आल्या होत्या. जया प्रदा यांनी बराच काळ बॉलिवूडवर राज्य केलं.

जया प्रदा यांचा जन्म ३ एप्रिल १९६२ रोजी झाला होता. जया प्रदा यांचं खरं नाव ललिता राणी आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी त्यांनी स्वतःचं नाव बदलून जया प्रदा असं ठेवलं. अभिनय क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी राजकारणात एंट्री केली आणि त्या ठिकाणीही स्वतःची वेगळी छाप सोडली.

जयाने वयाच्या 13 व्या वर्षीच सिनेजगतात पाऊल ठेवले होते. प्रोफेशनल लाइफमध्ये त्या सुपरहिट ठरल्या असतील, पण वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.

जयाप्रदा यांनी आपल्या करिअरमध्ये 200 हून अधिक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले. जयाप्रदा त्या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी 70 आणि 80 च्या दशकातील काही सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. जया यांच्या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून झाली, पण त्यांना ओळख फक्त बॉलिवूडमधूनच मिळाली.

जया जेव्हा त्यांच्या करिअरच्या शिखरावर होत्या, तेव्हा त्यांचे नाव चित्रपट निर्माते श्रीकांत नाहटा यांच्याशी जोडले गेले. मात्र, दोघांनीही या नात्याला नेहमीच मैत्रीचे नाव दिले. 1986 मध्ये 22 जून रोजी त्यांनी श्रीकांत नाहटासोबत लग्न केले. त्यावेळी नाहटा विवाहित होते आणि त्यांना तीन मुले होती.

एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, जयाप्रदासोबत लग्न केल्यानंतरही नहाटा यांनी पहिल्या पत्नीला सोडले नाही. याशिवाय त्यांनी जयाला आई होण्याचा आनंदही दिला नाही. त्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता येऊ लागली आणि हळूहळू दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर जया आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेऊन आता त्याच्यासोबत राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT