Birthday special know about ritesh and genelias lovestory
Birthday special know about ritesh and genelias lovestory  
मनोरंजन

Happy Birthday Riteish : जेनेलिया-रितेश या 'लय भारी' कपलची अशी आहे लव्हस्टोरी !

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता रितेश देशमुख याचा आज 41 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सकाळ टीमकडून शुभेच्छा. रितेश आणि त्याची बायको जेनेलिया यांची जोडी फेवरेट आहे. बरेच वर्ष डेट केल्यानंतर हे कपल अखेर लग्नबंधनात अडकले. पण, चाहते त्यांची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. रितेशच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या रितेश आणि जेनेलिया यांच्या लव्हस्टेरीची कहाणी ! 

रितेशचा जन्म 17 डिसेंबर 1978 ला झाला. विलासराव देशमुख यांचा रितेश हा दुसरा मुलगा. संपूर्ण घराणं राजकारणात होतं आणि तरीही लहानपणापासूनच रितेशला अभिनयाची आवड होती. रितेशने 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाने त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटादरम्यान रितेश आणि जेनेलिया यांची भेट झाली. चित्रीकरणावेळी विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 

पण, मुख्यमंत्रींचा मुलगा असल्याने रितेशला काहीसा अॅटीट्यड असेल असा विचार जेनेलियाने केला आणि म्हणून सुरुवातीला रितेशला तिने गांभिर्याने घेतलं नाही. त्यानंतर एकत्र काम करताना त्यांच्यामधील मैत्री वाढली. त्यावेळी रितेश 23 वर्षांचा होता तर जेनेलिया फक्त 16 वर्षांची होती. 

जेनेलिया आणि रितेश या कपलकडे पाहिल्यानंतर 'रब ने बना दी जोडी' अस म्हणावसं वाटतचं. रितेश आणि जेनेलिया जवळपास 8 वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 2 फेब्रुवारी 2012 मध्ये हे क्युट कपल लग्नबंधनात अडकले. 

तुझे मेरी कसम, तेरे नाल लव्ह हो गया आणि लय भारी या चित्रपटांतून रितेश आणि जेनेलिया यांनी एकत्र काम केलं. या कपलची लव्हस्टोरी फेमस होण्याचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे जेनेलिया ख्रिश्चन आणि रितेश हिंदू आहे. त्यांचा 'तेरे नाल लव्ह हो गया' हा चित्रपट तुफान फेमस झाला. या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात प्रचंड गर्दी केली होती.

हे दोघं इन्स्टाग्रामवर अॅक्टीव असतात आणि एकमेकांसलोबतचे क्युट फोटो सतत शेअर करत असतात. चाहत्यांच्या मते ही जोडी खऱ्या अर्थाने 'कपल गोल्स' आहे.या कपलला दोन गोंडस मुलं आहेत, मोठ्या मुलाचं नाव 'रिआन' आहे तर दुसऱ्या मुलाचं नाव 'राहिल' असं आहे.

रितेशने अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत आणि वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या. हेरा फेरी, डबल धमाल, बॅंजो, क्या सुपर कुल है हम, हाऊसफुल 2, लय भारी, एक विलेन, ग्रॅंड मस्ती, माऊली  असे अनेक सुपरहिट सिनेमे त्याने केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT